ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ग्रामीण काँग्रेसच्या पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्षपदी अँड. अविनाश भालेराव यांची नियुक्ती


जळगाव अखिल भारतीय काँग्रेस कमेटीतर्फे संघटन सृजन मोहिम राबवून महाराष्ट्र राज्य नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका जाहीर करण्यात आल्या आहेत जिल्हा तालुका व गाव पातळीवर जाऊन पक्षातील जुन्या अनुभवी ज्येष्ठ काँग्रेसचे युवक,महिला व सर्वसमावेशक कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून प्रत्येक ठिकाणी जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच राबविण्यात आली.त्यानुसार जळगाव जिल्हा ग्रामीण पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून अँड. अविनाश मुकुंदराव भालेराव यांची निवड करण्यात आली.काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशाने संघटन सचिव खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी राज्यभरात विविध 60 जिल्हा ध्यक्षांच्या नियुक्त्या एका संयुक्त पत्रान्वये जाहीर केल्या आहेत.मूळ पाचोरा येथील अँड.अविनाश भालेराव यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत एनएसयुआय च्या शहर उपाध्यक्ष पदापासून सुरुवात केली,पुढे याच काँग्रेस प्रणित एनएसयुआय विद्यार्थी चळवळीचे जिल्हाध्यक्ष,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अशा विविध पदावर गेल्या 27 वर्षापासून त्यांचे काम राहीलेले आहे. अलीकडे अनेक पक्ष नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करून चांगली पदे पदरात पाडून घेतली असताना श्री. भालेराव यांना सुद्धा तशी संधी असताना ते काँग्रेसचे निष्ठावान म्हणून कायम राहिल्याने त्यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पश्चिम विभागाच्या पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर पारोळा,एरंडोल व धरणगाव अशा 7 तालुक्यांच्या जळगाव लोकसभा मतदारसंघात सद्या काँग्रेस पक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना अँड.अविनाश भालेराव पक्ष संघटना कशी मजबूत करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button