ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्यासाठी उत्तम दिनचर्या महत्त्वाची : महापौर दीपमाला काळे जळगाव महानगरपालिकेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा


जळगाव: “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या उत्तम ठेवली पाहिजे. असे महत्त्वपूर्ण वाक्य जळगाव जिल्ह्याच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट सांगितले तसेच विविध लसीकरण वेळेवर करून घेणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले.जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार 7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त’ राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, स्थानिक नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अर्शिनबानो खाटीक, मुख्य वैद्यकीय अधिकारी: डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वैभव वारके यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व आणि महानगरपालिकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी आरोग्याप्रती जागरूक राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश अमोदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी उपस्थितांचे आभार मानले.या सोहळ्याला दवाखाना विभागातील विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी आणि जनजागृतीच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button