क्राईम ब्रँच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्याकडून 56 जणांची फसवणूक मुंबई

मुंबई ठाणे पोलिसांनी तोतया अधिकारीलां अटक केली आहे वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या पोलिसांनी क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 56 जणांची फसवणूक केली असून ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणातील दोन आरोपींना उत्तर प्रदेश लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली व्यंकटेशनंद यांचे वडील रामचंद्र पाध्ये वय 86 राहणार रहेजा गार्डन वागळे इस्टेट ठाणे यांना राकेश सिंग नावाच्या क्राईम ब्रँच अधिकारी असून मी ऑफिस मधून बोलत आहे तुमच्या नावाची मनी लॉडरीगची एफ आर आय केस दाखल करण्यात आली आहे तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक वॉरंट जारी केले आहे त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी तसेच निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी सदानंद पाध्ये यांना आठ लाख 65 हजार 153 रुपयांची आरटीजीएस करण्याचे सांगितले त्यानुसार आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे या प्रकरणी सोनाली घाट यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती तक्रारीवरून बी एन एस कलम 319 (2) 318 (4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम (66) क (66) ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी यांच्याकडून फिर्यादी यांच्या वडिलांची फसवणूक करून प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी 5 लाख 65 हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच 5 मोबाईल’ बॅग’ कार एअरटेल कंपनीची 6 सिम कार्ड वेगवेगळ्या कंपनीची 20 डेबिट कार्ड बँकांच्या खात्यांचे 9 चेक जप्त करण्यात आले आहे तपासातून आरोपी याकडे तपास केला असता त्याच्या बँक खात्यात त्याने एकूण 59 जणांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे सदर आरोपी यांनी फसवणूक केली ती रक्कम क्रिप्टो करन्सी मध्ये परिवर्तित करण्यात आली त्याबाबत तांत्रिक तपास करून अद्याप पावतो जवळजवळ 4000 क्रिप्टो करन्सी अंदाजे 3:’20 इतक्या रकमेचा शोध लागला आहे गुन्यातील आरोपी यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आशुतोष डुबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर विनायक देशमुख अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे प्रशांत कदम पोलीस उपयुक्त परिमंडळ 5 वागळे इस्टेट ठाणे यांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून शिवाजी गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे इस्टेट पोलीस स्टेशन यांनी प्रवीण माने पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रवीण सावंत पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अतुल जगताप हवालदार गावडे शिरसाट पोलीस नाईक चव्हाण पोलीस शिपाई वाघमारे महिला पोलीस शिपाई पटेल यांना दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्यातील आरोपी काहीही माहिती नसताना गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत हे करीत आहे


