ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने झालेल्या सोहळ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी (२१ मार्च) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.महापुरुषांना अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणात असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि सभागृह नेते नितीन लढ्ढा यांच्यासह उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण स्थापना दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांच्या आणि अभ्यागतांच्या आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. महापालिकेच्या सहाव्या मजल्यावरील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयाजवळ ‘सॅनिटरी वेंडिंग मशीन’ बसवण्यात आले असून, त्याचे लोकार्पण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थित नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांनी स्वागत करत प्रशासनाचे कौतुक केले.या प्रसंगी महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रगतीचा आढावा घेत आणि शहराच्या विकासाचा संकल्प करत हा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. प्रसंगी महापालिकेचे प्रांगण रांगोळी व फुलांनी तसेच प्रवेशद्वारजवळ फुगे लावून सजविण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button