ताज्या बातम्या

सॅनिटरी वेंडिंग मशीन लोकार्पणसह स्वच्छतेविषयी सामाजिक संस्थांसोबत परिसंवादाचे आयोजनजळगाव शहर महानगरपालिकेचा शनिवारी स्थापना दिन नवीन उपक्रम राबविण्यात सक्षम महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर दीपमाला काळे


.

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवार 21 मार्च 2026 रोजी महापालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचे प्रथम नागरिक महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत महानगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सकाळी 10 :30 वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यानंतर महिला कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या महिलांची सोय लक्षात घेता, महापालिकेच्या सहाव्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘सॅनिटरी वेंडिंग मशीन’चे लोकार्पण महापौरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यानिमित्ताने सकाळी ११ वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’ या विषयावर शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाला शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, जळगाव शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.स्थापना दिनानिमित्त आयोजित या सर्व कार्यक्रमांना महापालिका प्रशासनातील अधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button