महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापौर दीपमाला काळे यांचा महत्त्वपूर्ण संदेश श्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..! सत्य माणसाची तीन लक्षणे असतात मी चुकीचे काम करत नसल्याने मला चिंता वाटत नाही माझ्याकडे ठाम विचार असल्याने मनात गोंधळ नसतो आणि जो नेहमी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणे असतो त्याला कशाचीही भीती नसते.

जळगाव : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले श्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन स्वतःला निरोगी ठेवावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे. जळगावच्या महिलांशी जागतिक दिनानिमित्त महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संवाद साधत त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला असून, जळगावला अधिक सुंदर आणि प्रगत करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार आणि समाजाचा कणा आहे. आज जळगाव शहरातील महिला प्रत्येक क्षेत्रात,मग ते शिक्षण असो, व्यापार असो वा समाजकारण—आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, याचा मला अभिमान वाटतो









