ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता; रावेर बनावट आरटीओची चर्चा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉण्ड्री वर खानापूर आरटीओ नाक्यावर रावेरचे आमदार जावळे यांनी कार्यकर्त्यांसह आरटीओ नाक्याची तपासणी केली असता बिना पावती कर वसुलीचे पैसे आढळून आले तसेच चरस गांजा यांची वाहतूक सुरू असल्याची चर्चा महत्वपूर्ण माहिती तसेच आजूबाजूचे शेतकरी 10 किलोमीटर आपला शेतीमाल विकण्यासाठी महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेश मध्ये जातात मुख्यता केळी उत्पादक शेतकऱ्या ंच्या वाहतुकीवर अवैध वसुली बाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी आरटीओ निरीक्षकांना दिला


रावेर तालुक्यातील खानापूर आरटीओ चेक नाक्यावर दिनांक 3/3/2026 मंगळवारी रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी अचानक तपासणी केली असता अनेक महत्त्वपूर्ण माहिती जावळे यांना मिळाली कारण त्यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच चरस व गांजाची तस्करी चोरट्या मार्गाने होत होती आरटीओ चेक पोस्टवर ज्यादा भार नसलेल्या मालवाहतूक ट्रक चालकांकडून विना पावती अवैध कर वसुली होत होती या सर्व तक्रारीची दखल घेऊन आमदार जावळे यांनीआपल्या कार्यकर्त्यांसह अचानक खानापूर चेक पोस्टला भेट दिली आणि तपासणी केली यावेळी मोटर वाहन निरीक्षक रवींद्र नारळे यांना विचारपूस केले असता ते उडवा उडवी ची उत्तर देत होते चेक पोस्ट परिवहन नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्यामुळे अवैध कर वसुली सुरू होती बनावट आरटीओ ची टोळी असल्याची चर्चा परिसरात सुरू होती खानापूर चेक पोस्टला बायपास करून विविध ग्रामीण मार्गांनी चोरट्या पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या डोळ्या तसेच बोगस आरटीओ म्हणून कर वसूल करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती बनावट आरटीओ चा पर्दाफाश करण्याची मागणी संबंधितांकडून होत होती भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक त्यानंतर डॉक्टर विशाल जयस्वाल डॉक्टर सुरेश पाटील संजय महाजन विजय महाजन यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तोल काट्यावर वजन होण्यापूर्वीच वाहनांच्या रांगेत उभे असलेल्या केळी मालवाहतूक ट्रक चालकाकडून विना पावती कर वसुली केली जात होती प्रत्यक्ष ट्रकचालक यांनी ही माहिती दिली मर्यादित क्षमतेच्या आत ज्यादा भार नसताना देखील करवसुली होत होती तसेच चालकांशी उद्धट वर्तन केले जात असल्याचे चालकांनी सांगितले त्यामुळे आमदार जावळे यांनी विचारपूस करून आरटीओ निरीक्षक यांची कान उघडनी केली सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतं असल्याची माहिती मिळाल्यामुळे आरटीओचे सगळेच काळे कारनामे व बीग फुटले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button