ताज्या बातम्या
तालुका पाचोरा पुनगाव रोड येथील गजानन महाराज मंदिरात ७ तासांत साकारलेली भव्य रांगोळी १४८ व्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावपूर्ण रांगोळी सेवेचे आयोजन करण्यात आले.तब्बल ७ तासांच्या अथक परिश्रमातून ही आकर्षक व भावस्पर्शी रांगोळी साकारण्यात आली आहे.

पुनगाव रोड येथील गजानन महाराज मंदिरात ७ तासांत साकारलेली भव्य रांगोळी१४८ व्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावपूर्ण रांगोळी सेवेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ७ तासांच्या अथक परिश्रमातून ही आकर्षक व भावस्पर्शी रांगोळी साकारण्यात आली आहे.ही अप्रतिम रांगोळी सेवा कलाकार शैलेश कुलकर्णी, सत्यजीत पाटील, ओमकार केंडले, ओम् पाटील, देवांगिनी मोकाशी व अमन कुमार यांनी रेखाटली असून श्री गजानन महाराजांचे दिव्य रूप व संदेश अत्यंत सुंदररीत्या रांगोळीतून साकारण्यात आला आहे.ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी व नागरिकांनी पुनगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









