महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरटीओ कार्यालयातील भरारी पथकाने जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांची परस्पर विल्हेवाट सोबत दोन पटर घेतले की शासनाचे नियम गेले तेल लावत गेल्या वीस वर्षापासून वसुली सुरू असून असे गोरख धंदे शासनाच्या तिजोरीत पैसा न जाता कोट्यावधी गेले कुठे? थेट वरपर्यंत हप्ते असल्याशिवाय कोट्यावधी रुपयांची विल्हेवाट लागू शकत नाही विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस वाहन निरीक्षकांची दबंगगिरी जबाबदार पालकमंत्री सामाजिक कार्यकर्ते जळगाव गणेश ढेंगे

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरटीओ भरारी पथक रस्त्याने फिरताना दिसत असतात त्यांच्याबरोबर दोन पटर असतात महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून तालुक्यातून भरारी पथकाने जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांची परस्पर विल्हेवाट लागली कशी शासनाचा कर बुडवून परस्पर पैसे वाटून घेतले परभणी येथील उपप्रादेशिक कार्यालयातील परिवहन मोटार वाहन निरीक्षक अतुल भागवत व त्यांच्या दोन पंटरासह शासनाचे सर्व आदेश धाब्यावर ठेवून वीस वर्षापासून कोट्यावधी रुपयांची वसुली जमा करत होते तसेच हीच हकीगत प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आली आहे दंडात्मक रूपाने वसुली होणारी रक्कम ही शासनाच्या तिजोरीत न जाता त्या कोट्यावधी रुपयांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि पैसा वसूल करण्यात यावा अशी जनतेतर्फे मागणी होत आहे या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा होऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी सामाजिक कार्यकर्ते जळगाव येथील गणेश ढेगे यांनी केली आहे गजानन गायकवाड परभणी जिल्ह्यातील आरटीओ गाडी ड्रायव्हर जिल्ह्यातील जिल्हा बँकेतील कर्मचारी उत्तम गोंधळकर यांनी जिल्ह्यातून जाणारे अवजड वाहने त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लहान मोठ्या वाहनधारकांकडून विविध कारणे दाखवून दंड वसूल केल्याच्या तक्रारी असून वाहनधारकांकडून वेगवेगळ्या कारणांद्वारे पैसे वसुली करत होते सगळ्यात पहिले सीमा नाका तिथे तर वसुली व्हायची पण आता जिल्ह्यातही वसुली म्हणजे डबल वसुली त्यात डिझेलचे भाव गगनाला भिडले वाहन चालकांनी करावे तरी काय? यांना पगार असूनही जनतेला त्रास देणे हेच पहिल्यापासून धंदे वाहनचालक मालक यांना अनेक भुर्दंड विनाकारण आरटीओ निरीक्षक व त्यांचे चमचे त्रास देत होते या वसुली बाबत नांदेड परभणी लातूर हिंगोली बीड अनेक ठिकाणी आरटीओ कार्यालयात तक्रारी करूनही त्यांना न्याय मिळत नव्हता अतुल गोंधळ कर याने चांगलाच गोंधळ घातला त्याला ओव्हरलोड ऑपरेटर म्हणून पद दिले होते त्याचा फायदा त्याने संपूर्ण मराठवाड्यात घेतला त्याची बेकायदेशीर नेमणूक असून सुद्धा त्याच्यावर आतापर्यंत काही एक कार्यवाही झाली नाही संपूर्ण मराठवाड्यात वाळू माफिया वीट भट्टी मालक चालक रेशन ठेकेदार रेल्वे खाजगी कॉन्ट्रॅक्टर स्टोन क्रेशर ओव्हरलोड करणाऱ्यांवर दर महिन्याला हप्ते ठरवले होते त्यातून सुद्धा काळी कमाई मोठ्या प्रमाणात होत होती आणि कोट्यावधी क* कमईची विल्हेवाट कशी लावली अनेक कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यांच्यावर काही एक कार्यवाही होत नाही गेंड्याची कातडी पांघरून झोपलेले सरकार जनतेचा विकास कधी करणार का जनतेलाच लुबाडत राहणार?







