ताज्या बातम्या

परमपूज्य स्वामी श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी जी महाराज श्री क्षेत्र वेरूळ यांचे मलकापूर पांगरा येथे जनशांती धर्म सोहळा संपन्न प्रवचनातून जातिभेद करू नका महत्त्वपूर्ण संदेश


परमपूज्य स्वामी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी जी महाराज श्री क्षेत्र वेरूळ यांचे मलकापूर पांगरा येथे जनशांती धर्म सोहळा संपन्न दिनांक 1/12/2024 परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचे शिष्य परिवार आजूबाजूच्या गावातून महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सेवेधारी महिला व पुरुष यांच्या अथक परिश्रमातून सडावर्जन रांगोळी व फुलांनी परिसर बहरून टाकला विशेष म्हणजे बाबाजींसाठी पर्णकुटीया बनवण्यात आली यासाठी विशेष करून नाशिक येथील दिनकरराव सानप सखारामजी गीते माजी सैनिक रमेशराव सांगळे बापूराव टेकाळे या सर्व बाबाजींच्या विशेष सेवेकरांनी कुटिया तयार केली ही कुटिया बघून अनेक लोकांना आश्चर्य वाटले कारण आजही जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांना आशीर्वाद महत्वपूर्ण त्यांनी जनार्दन स्वामी यांचे कार्य पूर्णत्वाला नेले आजही जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे महत्व काय होते ते पूर्ण नियम शांतिगिरी महाराज यांनी पूर्ण केले आजही दहा ते वीस फुटावरून स्त्रिया महिला वर्ग दर्शन घेतात हा नित्य नियम जगद्गुरु जनार्दन स्वामींचा होता त्यामुळे आजही सगळं टिकून आहे आजही शाळा कॉलेज आश्रम निरंतर अन्नदान सेवा सुरू आहे आणि जनार्दन स्वामींचे बाबाजींचे जेवढे शिष्यगण होते ते सगळे परत एकत्र आले ते सगळे एकत्र आल्यामुळे शांतिगिरी महाराज आणि जनार्दन स्वामींचे शिष्य यांची ताकद फार मोठी झाली बाबाजींच्या आशीर्वादाने मुके बोलायला लागले आंधळ्यांना डोळे आले माता भगिनींना पुत्रभव आशीर्वाद मिळाले अनेक व्यसनी लोकांचे व्यसन सुटले या सोहळ्यासाठी अनेक संत मंडळी उपस्थित होते ह भ प प्रेमानंद जी महाराज श्री शेत्र माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा ह भ प केशव महाराज बुधवंत जगद्गुरु संत तुकोबाराय आश्रम संस्थान थोरपांगरा येथील ह भ प सतीश महाराज डोईफोडे श्री शेत्र शंकर गड येथील वारकरी हजर होते या सोहळ्यात ह भ प प्रेमानंद जी महाराज ह भ प केशव महाराज यांची प्रवचने झाली या कार्यक्रमाला अनेक भाविकांनी महिला वर्ग यांनी परिश्रम घेतले सेवा दिली अध्यात्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे यांनी मोठ्या प्रमाणावर सेवा दिली त्यामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला भोजन व्यवस्था साई महिला सेवेकरी मलकापूर यांनी केली जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पालखी व फोटोचे पूजन माननीय अरुण भाऊ मखमले यांनी केले आणि संत मंडळी यांच्या व्याख्यानातून चांगले उद्देश लोकांना मिळाले कोणीही जिवाचा न घडो मच्छर जीवनात आल्यानंतर सत्कर्म करा जातीभेद करू नका सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली कुठल्याही धर्माचा आदर करावा उचनीच असे मानू नये त्यामुळे समाज पुढे जातो प्रामाणिकपणा अंगी ठेवा भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्याना पाणी द्या निराधारांना आधार द्या बाबाजींच्या धर्मसोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविकांना रोगमुक्त भयमुक्त व्यसनमुक्त केले कार्यक्रमाला आजूबाजूच्या खेड्यातून काही नाशिक जिल्ह्यातून तर काही जळगाव असे अनेक तालुक्यातील जिल्ह्यातील ठिक ठिकाणाचे बाबाजींचा भक्त परिवार एकत्र आला आणि सर्व एकवटला गावातील सरपंच तसेच अनेक गावकरी उपस्थित होते ज्यांनी ज्यांनी बाबाजींच्या कार्याला सहकार्य केले त्यांचे जय बाबाजी भक्त परिवार तर्फे आभार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button