ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भडगाव येथील देशमुख महा_ विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त अभिवादन अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर //कपाशीले बोंड ऊन नाही त्याले बोंड म्हणू नये// हरिनामाईना बोले त्याले तोंड म्हणून नये,


भडगाव प्रतिनिधी विजय माळी:_
अरे संसार संसार तवा चुल्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर” अशा बोलीभाषेतील काव्यातून जीवनविषयक तत्त्वज्ञान साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडणाऱ्या निसर्गाची विविध रूपे रेखाटणाऱ्या शेतकऱ्याचे जगणं मांडणाऱ्या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. मराठी विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्य प्रांतातील काव्यलेणे होय. त्यांची कविता मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. निसर्ग, पशु-पक्षी, शेतकरी, सासर-माहेर, सण-उत्सव असे बहुविध विषय त्यांच्या काव्यातून मांडले गेले. त्यामुळे त्यांचे काव्य सर्वस्पर्शी झाले. बहिणाबाईंच्या काव्यातील भावभावना, जीवनविषयक तत्त्वज्ञान आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे बहिणाबाई चौधरींसारख्या प्रतिभावंत कवयित्रीला अभिवादन करणे क्रमप्राप्त ठरते, असे ते कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना म्हणाले कार्यक्रमाला इतिहास विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील डॉ. डी. ए. मस्की, प्रा. आर. एम. गजभिये, प्रा. एस. सी. पाटील, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रवीण देसले, प्रा. श्रद्धा ठाकूर, प्रा. स्नेहा गायकवाड, प्रा. उज्ज्वला पाटील, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अधिकराव पाटील यांनी केले तर प्रा. ज्योती नन्नवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”504e51b3-dbb6-4081-a511-da6c3b6f35ef”,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”504e51b3-dbb6-4081-a511-da6c3b6f35ef”,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};
{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button