ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज जि: जळगाव पाचोरा तालुक्यातील महसूल विभागावर प्रश्नचिन्ह? वाळूच्या साठ्याचा पंचनामा होऊन 1 महिना होऊनही वाळूचा साठा गायब अनेक ठिकाणी मागील काळात वाळूचे साठे गायब झाले तहसील विभाग निद्रा अवस्थेत शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे गायब अजून पर्यंत निकाल लागत नाही आशीर्वाद कोणाचा? त्यानंतर सट्टा पत्ता मटका पुन्हा जोमात सुरू जनतेला फक्त आश्वासन देऊन अनेक मोठमोठे भ्रष्टाचार थांबवणार कोण? सरकारी खरेदी केलेली मक्का पाचोरा मार्केटमध्ये बेवारस चोराच्या उलट्या बोंबा?


सध्या पाचोरा महसूल विभागामध्ये भ्रष्टाचार थांबता थांबत नाही अनेक माहिती अधिकार टाकूनही चोर सोडून संन्याशाला फाशी शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे सरकारने दिले आणि पाचोरा महसूल विभागाने कशाप्रकारे गायब केले त्याचा अजून पर्यंत तपास लागत नाही काय तर म्हणे मे; कोर्टात केस चालू चोरी करणारे बाहेर फिरत आहे त्यांना कधी जेलमध्ये टाकणार? पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील अवैध वाळूसाठा मोठ्या प्रमाणावर होता तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून पंचनामा होऊनही जवळपास एक महिना झाला पण अजून पर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही नेमके कारण काय? आता तर वाळूचा साठा गायब झाला त्याचे चित्र समोर दिसत आहे मग कार्यवाही झाली आहे का? त्याची नोंद असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपलब्ध होत आहे दिनांक 20 जुलै 2026 रोजीच्या छायाचित्रात संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू साठा होता त्यानंतर 25 ऑगस्ट 2026 रोजी याच परिसराचे छायाचित्र घेतले असता वाळूसाठा गायब झाल्याचे चित्र समोर दिसत आहे या दोन्ही छायाचित्र म्हणजे प्रशासन महसूल विभाग निद्रा अवस्थेत? प्रशासनासाठी अनेक प्रश्न निर्माण करणारा हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे जर साठा अधिकृत होता तर त्याची कागदपत्रे जर अनअधिकृत होता तर जप्तीचे कागदपत्रे झाली का नाही? जर पंचनामा झाला असेल त्याची कागदपत्रे कार्यवाही कोणत्या टप्प्यात आहे त्याची उत्तर महसूल विभागाने द्यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाळू साठा त्या ठिकाणाहून हलविण्यात आला असेल तर तो कोणाच्या परवानगीने हलविण्यात आला? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे प्रशासन महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे का जनतेला लूटमार करण्याचे काम करीत आहे का? पंचनामा म्हणजे कार्यवाहीचा शेवट नव्हे? अवैध खनिज वाहतूक उत्खनन आणि साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्यात नवीन नियम झालेले असून त्यानुसार कार्यवाही झाली का? महाराष्ट्र शासनाने नियम लागू केले असल्यावर त्या नियमांना पाचोरा महसूल विभागाने बगल दिली वैध कागदपत्रे नसलेल्या खनिजाच्या वाहतुकीवरही नियमानुसार निर्बंध आहेत उपलब्ध शासकीय नियमानुसार वैद पास शिवाय खनिज वाहतूक केल्यास ती अवैध अनाधिकृत आहे त्यावर कायद्यानुसार कार्यवाही होऊ शकते म्हणून केवळ पंचनामा करून विषय संपत नाही संबंधित साठ्याची रॉयल्टी वैधता वाहतूक परवाना आणि साठ्यांचा शोध तपासणी ही महत्वपूर्ण क्रिया महसूल विभागाची असते वाळूचा थप्पा गेला कार्यवाही होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून महसूल विभागावर ताशेरे ओढले जात आहे महसूल विभागाकडे आवश्यक ती कागदपत्रे असल्याचे त्यांनी नमूद करावे जर कार्यवाही झाली असेल तर विलंबनाचे कारण स्पष्ट व्हायला पाहिजे परधाडे परिसरात मागील तीन वर्षापासून वाळू वाहतूक वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे रात्रीच्या वेळेस कर्कश आवाजामुळे गावकऱ्यांना झोपा येत नाही शासनाचा संभाव्य महसुलीचा प्रश्न उपस्थित होत आहे ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळेस निवेदने देण्यात आली परंतु मसूर विभागाने त्यांना कचऱ्याचा डबा दाखवला जी महत्वाची कामे करायची आहे ती कामे करत नाही शेतकऱ्यांच्या अनुदान हा प्रश्न ऐरणीवर असताना महसूल विभाग करते तरी काय? त्यानंतर सरकारी खरेदी केलेला मक्का चोरी झाला तर तो मार्केटमध्ये विक्रीसाठी कसा काय आला? तो मक्का कोणाचा आहे त्याला वारसदार कोणी नाही याचा अर्थ काय यांना चोर सापडत नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button