ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज आज 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन//मुंबई पावसाळी अधिवेशनात चाललंय तरी काय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे आणि हमीभाव पिक विमा महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचे ऐवजी आमदार आणि खासदार वेगळीच दिशा देत आहे खासदार संजय दिना पाटील पत्रकारांना धमकी देतात// दुसरीकडे पुण्यामध्ये लाखो रुपये शिक्षणामध्ये टाकून आयटी कंपनीमध्ये नोकरीला असणाऱ्या तरुणांची आयटी कंपनीकडून फसवणूक पुण्यामध्ये 37 आयटी कंपन्यां रातोरात बंद 4 महिन्याचा पगार न देता उलट प्रत्येकी 15 हजार रुपये लॅपटॉप व सुरक्षा ठेव साठी जमा करून अधिकारी फरार अधिवेशनात अशा आयटी कंपन्यांचा प्रश्नावर खुलासा कधी करणार?


महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशन म्हणजे काय? जनतेच्या समस्यांचे समाधान करणे म्हणजेच अधिवेशन होय/ त्या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न यांची चर्चा न करता वेगळेच विषयाला वळण लावून महत्वपूर्ण प्रश्नांना बगल देण्यात येत आहे// आज 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती जनतेसाठी राजा असा असला पाहिजे पण आजकाल सगळे उलट सुलट कार्य राज्यात सुरू आहे महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत जातीय उच्चं_नीचता विषमता विरुद्ध बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारे सामाजिक न्याय सुधारक आरक्षणाचे जनक बहुजनांचे कैवारी लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांना 152 व्या जयंतीनिमित्त अभिवादन भारतात सुमारे 75 ते 80 कोटी ओबीसी एससी एसटी अशा बहुजन महापुरुषांचे विचार आचरणात आणून त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा कारभार चालू ठेवावा अशी सर्व बहुजन महापुरुषांची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा आजपर्यंत पूर्ण झाली नाही आणि 5% टक्के लोकांनी ती अपेक्षा पूर्ण होऊ दिले नाही//तर या 5,% टक्के लोकांनी 75 ते 80 कोटी ओबीसी एससी एसटी जनतेला संविधानाने जो हक्क अधिकार दिला त्याची अंमलबजावणी आजपर्यंत पूर्ण होऊ दिली नाही आणि ती झाली नसली तरी ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपण निवडून दिलेल्या आमदार खासदारांची असते परंतु कोणत्याही अधिवेशनात जनतेने निवडून दिलेले आमदार खासदार आपले तोंड उघडत नाही बर बाहेर येऊन खोटे आश्वासन देतात यामुळे देशाची परिस्थिती अतिशय बिकट झाली देशात निवडणुका हाच मुख्य मुद्दा उद्देश असून देशाच्या विकासासाठी अल्प प्रमाणात निधी वापरणे कोणतीही काम अपूर्ण//जनतेच्या विकासासाठी आलेला निधी पूर्णपणे त्या कामावर खर्च न होणे हा देशाचा विकास नव्हे तर आपल्या पक्षासाठी जागतिक बँकेचे कर्ज घेऊन पक्षासाठी आणि स्वतःसाठी वापर करणे यामुळेच भारत देशावर कर्जाचा डोंगर करून ठेवला जगामध्ये भारत देश हा सगळ्यात मोठा कर्ज घेणारा देश झालेला आहे मग एवढा पैसा गेला कुठे स्विस बँकेत भारताच्या बँकेमधून कर्ज घेऊन भगोडे विदेशात पळाले ते अजून पर्यंत सापडत नाही ते पळून कसे काय गेले कोणी पळवले असे अनेक प्रश्न प्रलंबित याच्यावर चर्चा नाही पुण्यामधील हिजवडी फेज 2 मधील किंग टेक्नॉलॉजी ही रातोरात बंद झाली आहे याबाबत कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना कल्पना देण्यात आली नव्हती 700 हून अधिक तरुण घरी बसले तर 4 महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेच नाही अनेकांच्या पेमेंटचे चेक बाउंस झाले एवढेच काय तर लॅपटॉप खरेदीसाठी आणि सुरक्षा ठेव यासाठी 15000 रुपये असे सांगून ही रक्कम घेण्यात आली ही रक्कम आता कंपनीचे अधिकारी घेऊन पळाले जागतिक मंदीचे वातावरण सुविधांचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर यामुळे कंपन्या बंद होत आहे किंवा कंपन्या स्थलांतर करता आहेत आतापर्यंत 37 आयटी कंपन्यांनी पुणे शहर सोडलं भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या आयटी कंपन्या वर ही वेळ का आली आहे आणि भविष्यात काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे याविषयी अधिवेशनात बेरोजगारी बाबत आणि या आयटी कंपन्या बंद का होत आहेत याबद्दल प्रश्न उत्तरे झाली पाहिजे तो प्रश्न मार्गी लावा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button