ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ विकसित राष्ट्रासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचे असणार : मा शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे


प्रतिनिधी | भुसावळ गोपी अण्णा
भारताच्या विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचालीत ऊर्जा क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 2047 पर्यंत वाढती ऊर्जामागणी पूर्ण करताना स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार, ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणीय समतोल साधणे ही भारतासमोरील प्रमुख आव्हाने असतील. सौर, पवन, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन तसेच आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे ऊर्जा क्षेत्र भविष्यात मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले.आर. जी. झांबरे विद्यालयात अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवल महाजन, पर्यवेक्षक हेमंत चौधरी, परीक्षक अविनाश मोरे, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, विषयतज्ज्ञ संजय गायकवाड, सचिन पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 : भवितव्य आणि आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी विविधांगी माहिती व विचार प्रभावीपणे सादर केले. ऊर्जा निर्मितीचे पारंपरिक स्रोत, नवीकरणीय ऊर्जा, सौर व पवन ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा बचत तसेच भविष्यातील ऊर्जा आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले परिपत्रकाचा अभ्यास केल्यास स्पर्धेत चुरस निर्माण होईल : सुनील वानखेडे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुनील वानखेडे म्हणाले की, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर यांच्यावतीने विज्ञान विषयक विविध उपक्रमांसंदर्भात परिपत्रके निर्गमित केली जातात. विद्यार्थ्यांनी या परिपत्रकांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान मेळाव्यात सादरीकरण करताना तक्त्यांची संख्या, त्यांचे आकारमान तसेच परीक्षणाचे विविध निकष यांची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. या बाबींचा योग्य अभ्यास केल्यास स्पर्धेत निश्चितच चुरस निर्माण होईल. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही संबंधित सर्व परिपत्रकांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक निधी महेश चावराई (सेंट अलायसेस हायस्कूल, भुसावळ) हिने मिळविला. द्वितीय क्रमांक कुनीका पंकज बेंडाळे (के. नारखेडे विद्यालय, भुसावळ) हिने मिळविला. तर उत्तेजनार्थ राधिका सचिन पाटील (श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दीपनगर) हिची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून ऊर्जा क्षेत्रातील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आणि विकसित भारताच्या उभारणीत युवा पिढीची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला. विज्ञान मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि भविष्यातील आव्हानांकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री सरोदे यांनी केले, तर आभार प्रशांत वंजारी

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”a8d65752-c87a-47c0-9c4a-2d46da2748e1″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button