शेतकऱ्यांनी शेती सोडली असती तर निश्चितपणे लक्षणीय प्रगती झाली असती मातीचा धंदा मातीच देणार नाही तर काय मोती थोडेच देणार!शेवटी कष्ट करून शेतकऱ्यांना काय मिळालं म्हणून आपल्या जीवावरच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दुसऱ्यांच्या भरोशावर त्याचा उपयोग नसतो कारण शेतकऱ्यांचा फायदा दुसरेच लोक उचलत असतात त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतः पुढे यावे तरच शेतकऱ्यांची प्रगती होईल डॉ; बाबासाहेबांच्या भाषेत शेतकऱ्यांच्या मध्यस्थी कोणीही दलाल नको स्वतः शेतकरी आणि बाजारपेठ सगळी सांभाळण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मुलांनी ठेवावी

शेतकऱ्यांनी शेती सोडली असती तर निश्चितपणे लक्षणीय प्रगती झाली असती मातीचा धंदा मातीच देणार नाही तर काय मोती थोडेच देणार! पहा जरा वडा तळला वीस रुपये हातात
चहा उकळला दहा रुपये हातात चुना मळला शंभर रुपये हातात स्क्रु पान्हा पक्कड फिरवली की दोनशे रुपये हातात तराजुत माल मोजला की 50 100 200 हातात स्टेथो लावला कि रुपया हातात पम्पचर काढ़लं शंभर रुपये आता टायरात हवा भरली वीस रुपये हातात चपलेला टाका घातला पैसा हातात ईस्तरी केली पैसा हातात कुणाचीही हजामत केली पैसा हातात देशी विकली रूपया हातात तीर्थ हातावर टेकवलं रुपयादक्षिणा ताटांत टोल नाक्यावर टाळी वाजवली दहा रुपये हातात दोन-चार मंत्र उच्चारले पाचशे हातात दोन तास सरकारी काम केले अख्खा पगार हातात भंगार विकले पैसा हातात शौचालयात संडास केली तरी दोन रुपये हातात अहो, भीक मागीतली तरी रुपया हातात. सारं कसं नगदी नगदी नगदी.उधार नाहीच, उशिरा तर कधीच नाही. इकडं हातात पैसा ताब्यात पण शेतीची व्यथा पहा, घाम गळे पर्यंत काम करा अन् सहा महीने वाट पहा शेत नागरलं पैसा नाही, शेत वखरलं पैसा नाही, शेत पेरलं पैसा नाही धान उगवलं पैसा नाही, रात्री बेरात्री पाणी दिलं पैसा नाही, अनवाणी शेत राखलं पैसा नाही महागा-मोलाचं खत घातलं पैसा नाही पीक आलं *पैसा नाही माल पार मोंढ्यांत घातला पैसा हातात नाही गाढवांनो..नांगरल्या पासून माल घाले पर्यंत पैसा नाही.मग झक मारायला शेती करायची का सगळ्यां धंद्यांत नगदी पैसा.शेतीत सहा महिन्यांनी विचार करा शेतकऱ्यांनो शेती तत्काळ बंद करा जगाची चिंता करू नका. ज्या हरामखोरांनी उत्तम शेती सांगीतली त्यांना भर चौकात नागडं करुन रुमण्याने ठोका तुम्हांला उत्तम शेती सांगीतली आणि स्वत: उत्तम नोकरी लाटली. करा कोणताही धंदा तरच हाती जमेल रोजच चंदा जर शेती कराल तर बांधावरच्या झाडांवर लटकाल किती जरी पिकली शेती तरीही नाही जाणार साडेसाती.पिक कितीही आलं जोरदारं योग्य भाव कधीच नाही मिळणांर शेतीचा कितीही आला पैका मोठा. त्याला आहेत सतराशे साठ वाटा.नाही शेतक-यांला कधीच सुखाची झोप सगळेच त्याला राबवून घेती नाही देत कसलाच रोब जगाचा पोशिंदा सदा उपाशी आयते कुत्रे रोज तुपाशी बळी तुझे बळ दाखवल्या शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांचा शेतीमाल जास्त प्रमाणात असल्यावर सरकार विदेशातून तोच शेतीमाल आयात का करतात कारण सगळ्या गोष्टीवर त्यांचं कमिशन ठरलेलं आणि शेतकऱ्यांची कशी फसवेगिरी करायची हे त्यांचे धंदे झालेले आहे









