ताज्या बातम्या

सीमा तपासणी नाक्यावर आरटीओ अधिकारी समोरच वाहन धारकांची लूट शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करता खाजगी पटर यांचा सर्रास वापर आरटीओ खात्यात इतका घोटाळा होत आहे तरी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे याचा अर्थ काय? अनेक तक्रारी करूनही जनतेची लूट थांबत नाही


महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी सीमा तपासणी आरटीओ नाक्यावर आरटीओ अधिकारी वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी सर्रासपणे खाजगी पंटराचा वापर करून सर्रासपणे रात्रंदिवस हजारो रुपयाची उलाढाल करत असल्याचे समजते महाराष्ट्र शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाजवळ किंवा परिसरात खाजगी नोकर दलाल पंटर यांना शासनाने बंदी घातली असून तरी ते कार्यालयाच्या आसपास फिरतात मोठ्या प्रमाणात सीमा खाजगी नाक्यावर खाजगी नोकर ठेवताना दिसतात तर दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही का नाही दिवसभरात हजारो वाहने येतात आणि जातात आरटीओ वाहन तपासणी नाक्यावर खाजगी पंटरांमार्फत लूटमार केली जात आहे संबंधित खात्याचे अधिकारी वर्ग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे सीमा तपासणी नाका म्हणजे एक प्रकारे लुटमार करण्याचा धंदा तर नाही ना असा सवाल जनता करीत आहे राज्य सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे अधिकारी वर्ग फक्त नावापुरते ड्युटी करतात आणि निघून जातात त्याच धोरणानुसार नाईट ड्युटी वाले आणि दिवसा बदली होणारे पटर यांची नेमणूक केलेली असते वाहनधारकाची लूट मात्र रात्रंदिवस सुरू असते हा प्रकार रात्रंदिवस सुरू असतो अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहे सीमा तपासणी नाक्यावर आतापर्यंत मागच्या दहा वर्षांपूर्वी अनेक वेळेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी धाडी टाकून कार्यवाही केली परंतु सध्याच्या काळात लुटमार ही सुरू असून तेवढ्यापुरती फक्त बंद होते आणि लगेच चालू होते सीमा तपासणी नाक्यावर खाजगी पंटराकडून जी लूट होत आहे यांच्या माध्यमातून जो पैसा जमा केला जातो त्या लुट मारीत कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे याचा शोध घेणे लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी यांचा आहे परंतु तशी क** कार्यवाही होत नाही सीमा तपासणी नाक्यावर खाजगी नोकर पंटर ठेवताना त्यांच्या कामाचा मोबदला कोणता अधिकारी आपल्या स्वतःच्या पगारातून देत आहे हा सुद्धा तपास झाला पाहिजे सीमा तपासणी नाक्यावर अनेक तक्रारी झाल्या असून या सर्व सीमा तपासणी नाक्यावर दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही का होऊ नये असा अहवाल तक्रारदार म्हणत आहे याची सखोलपणे चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आतापर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी कार्यवाही केल्या त्या अधिकाऱ्यांची बदली कुठे कुठे झाली आहे संबंधित खात्याचे हेड ऑफिस मुंबई आयुक्तालय मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लेखी तक्रार केली असून त्याची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही त्या मागण्यासाठी आमचे जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार दिली त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय कलेक्टर सो यांना लेखी तक्रारी दिल्या तरीही अजून पर्यंत ठोस कार्यवाही होत नाही ज्या अधिकारी वर्गावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी टाकून रंगेहात पकडून कार्यवाही केल्या त्यांना कायमस्वरूपी सेवेतून काढा अशी मागणी जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button