ताज्या बातम्या

शिवरायांचा गौरव जनतेपर्यंत पोहोच_ वण्यासाठी चित्रपट करमुक्त करण्याची शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांची मागणी


.

पाचोरा प्रतिनिधी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजेंद्र दगडू पाटील यांनी ‘राजा छत्रपती शिवाजी महाराज’ या ऐतिहासिक चित्रपटाला महाराष्ट्र राज्यात करमुक्त (Tax Free) घोषित करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री यांना लेखी निवेदन पाठवले आहे.सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी असून ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये देशभक्ती, स्वाभिमान आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.याशिवाय, चित्रपटाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि राष्ट्र निर्मितीतील योगदान अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.म्हणूनच राज्य शासनाने या चित्रपटाला करमुक्त दर्जा देऊन अधिकाधिक नागरिकांपर्यंत तो पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान, स्थानिक श्री.राजेंद्र पाटील हे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button