ताज्या बातम्या

जिल्हा बुलढाणा तालुका शेगाव येथील डोलारखेड गावठाण मोजणी प्रकरणी उपोषण मागे दुपारी 26 जानेवारी दुपारी ३ वाजता मागण्या मान्य; शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तोडगा भूसंपादन अधिकारी मा; गोडगे साहेब जिल्हा भूसंपादन अधिकारी बुलढाणा जिल्हा अधीक्षक अनंत झांबरे साहेब यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले शेगांव प्रतिनिधी


मौजे डोलारखेड ता. शेगांव जि. बुलडाणा येथील जुने गावठाण संदर्भातील भू.सं. प्र.क्र. १२/२०२२-२३ अंतर्गत संयुक्त मोजणी अहवालातील त्रुटी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय जिजामाता स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता प्रशासनाने ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण अधिकृतरीत्या मागे घेण्यात आले शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती या वेळी उपोषणस्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले जिल्हा भूसंपादन अधिकारी गोडगे साहेब जिल्हा भूमि अभिलेख कार्यालय, बुलढाणा जिल्हा अधीक्षक अनंत झांबरे साहेब जिगाव प्रकल्प यंत्रणेचे अधिकारी तुषार मेतकर व उमेश पाटील तसेच त्यांचे इतर सहकारी तालुका भूमि उपनिरीक्षक सोनार साहेब यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती प्रशासनाकडून स्पष्ट आश्वासन
प्रशासनाकडून ग्रामपंचायत नमुना ८-अ, मिळकत पत्रिका (आखीव पत्रिका) व प्रत्यक्ष स्थळावरील क्षेत्रफळातील तफावत याबाबत संबंधित धारकांच्या हरकतींची सखोल चौकशी करून नियमाप्रमाणे योग्य ती दुरुस्ती व पुढील कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले तसेच आवश्यक त्या ठिकाणी संयुक्त पाहणी व फेरमोजणी करून नागरिकांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली कायदेशीर मार्गदर्शन या प्रकरणात गावकऱ्यांना कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठीॲड. अमित दळवी, ॲड. अमित पाटील तसेच ॲड. अनंत देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली उपोषणकर्त्यांचे म्हणणे उपोषणकर्ते महादेवराव देठे व समस्त गावकरी यांनी सांगितले की,“प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे सर्वपक्षीय व सामाजिक पाठिंबा या आंदोलनाला केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जिगाव प्रकल्पाचे अभ्यासू नेतृत्व राजेश काटे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष डीवरे तसेच समस्त डोलारखेड गावकरी यांचा सक्रीय पाठिंबा लाभला माध्यमांची भूमिका सदर प्रकरणाला प्रेस व मीडियाकडून मोठे महत्त्व देण्यात आले Shegaon Live News चे संपादक संतोष देठे यांनी सातत्याने वृत्तांकन करून ग्रामस्थांच्या प्रश्नांना व्यापक प्रसिद्धी दिली दिलासा मागण्या मान्य झाल्यामुळे गावातील तणावपूर्ण वातावरण निवळले असून प्रशासन व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक संवाद घडून आला आहे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 65537; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8388608;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 305.25793;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 35;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button