ताज्या बातम्या

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांच्या भेटीला


बीड जिल्ह्यात वातावरण तापलेल असून बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राज्यपाल महोदयांनी राजीनामा घ्यावा असे निवेदन छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांना सुपूर्द केले यावेळी खासदार बजरंग सोनवणे विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे आमदार विजय वडेट्टीवार आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस ज्योती विनायक मेटे धनंजय जाधव (सरचिटणीस स्वराज्य पक्ष) अंकुश कदम (उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते बीड जिल्ह्याच्या मस्तजोग यांच्या समर्थनात आमदार खासदार सुद्धा मैदानात उतरले आंदोलन मोर्चा राज्यपालांना निवेदन देत असून वातावरण जास्त चीगळत चाललेले आहे त्यामुळे राज्य सरकारची झोप उडाली काहीतरी कारण शोधून जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून पोलीस स्टेशनला विरोधी कृती समितीने ठिय्या आंदोलन मांडले ही आग जास्त भडकू नये म्हणून सत्ताधारी डोकं लढवत आहे आरोपीला वाचवण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही जनता किती दिवस शांत बसणार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण शांत कसे होईल ते आंदोलन तेवढ्यात जोराने वेग धरत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button