ताज्या बातम्या

संविधाना नुसार राज _कारणात बदल झाला पाहिजे आणि विरोधक सुद्धा असले पाहिजे तरच जनतेचा विकास होतो दोंडाईचा व शिंदखेडा तालुक्यातील जनमानसाच्या हृदयातील एक उगवत आणि आश्वासक नेतृत्व महिलांचे सक्षमीकरण करणार बेरोजगार तरुणांना शेती आधारित कंपन्या सुरू करणार जन_ सामान्यांच्या बळावर चौथा आधारस्तंभ उभा करणार शिप्राताई रावल दोंडाईचा


दोंडाईचा व शिंदखेडा तालुक्यात सध्याच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत जनतेला नेहमीच अशा नेतृत्वाची आस राहिली आहे जे केवळ निवडणूक पुरता येऊन खोटी आश्वासने देणारे नसेल तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवून आणणारे असेल परंतु शिंदखेडा मतदारसंघाचे दुर्दैव आहे की मागील 15 वर्षापासून असे नेतृत्व मिळालेच नाही दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत या नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले ते कसे निवडून आले ते तर दोंडाईतील तळ्यागळाच्या नागरिकांना माहिती आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून एक प्रकारे लोकशाहीची हत्याच केली बिनविरोध निवडून आलेल्या सत्तेमुळे शहरात विरोधी पक्ष उरलेला नाही जे उरले सुरले होते त्यांनी ही आत्मसर्पण केले.अशी भावना अनेक नागरिक आणि राजकीय निरीक्षक व्यक्त करतात अशा परिस्थितीत नागरिकांच्या तक्रारी किंवा प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनीही लोटांगण घातले आहे आजच्या घडीला समाजकारण आणि राजकारणात आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने ज्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे, ते नाव म्हणजे आदरणीय शिप्रा ताईसाहेब रावल त्यांच्याकडे पाहताना दोंडाईच्यात व तालुक्यात एका खऱ्या, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या भावी नेतृत्वाची प्रकर्षाने जाणीव होते नेतृत्व म्हणजे केवळ पद किंवा अधिकार नव्हे तर ती एक जबाबदारी आहे हे शिप्रा ताई आपल्या सध्याच्या त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे सामान्य माणसाच्या सुख-दुःखात धावून जाणे, गरिबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर तत्परतेने मार्ग काढणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या या जनसामान्यांशी असलेल्या थेट नाळ आणि संवादामुळेच आज अबालवृद्ध स्वाभिमानी तरुण वर्ग लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील विशेषतः महिलांचे सक्षमीकरण तरुणांना रोजगाराच्या संधी आणि तळागाळातील घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे शेतीवर आधारित उद्योगधंदे या कामांना त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे व महिलांच्या प्रश्नांवर त्या ज्या आक्रमकतेने आणि संवेदनशीलतेने भूमिका घ्यायला हव्यात काही दिवसापासून त्यांनी सर्वसामान्य महिलांसोबत व तरूणासोबत संवाद साधताना त्यांच्यातील ऊर्जा आणि आधुनिक विचारांची सांगड तरुणांना व महिलांना नवी दिशा देणारी ठरत आहे नेतृत्वामध्ये वक्तृत्वासोबतच कर्तृत्व आणि संयम असणे अत्यंत गरजेचे असते शिप्रा ताई यांच्या व्यक्तिमत्त्वात या गुणांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो त्या सर्वसमावेशक विचारसरणीच्या आहेत ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्या आपल्या वाटतील त्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे आज संपूर्ण दोंडाईचा व परिसरात ‘आमचे भावी नेतृत्व’ म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जात आहे. त्यांची जमेची बाजू म्हणजे राज घराण्यातून येतात स्वच्छ प्रतिमा व उच्चशिक्षित असल्यामुळे दोंडाईतील सर्वसामान्य जनता त्यांना भावी नेतृत्व या आशेने पाहत आहे आजच्या घडीला समाजाला गतिमान पारदर्शक आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. शिप्रा ताई या गरजा तंतोतंत पूर्ण करतील यात तिळ मात्र शंका नाही त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा आणि जनसेवेचे व्रत पाहता येणाऱ्या काळात त्या शिंदखेडा तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर एक अत्यंत यशस्वी आणि खंबीर नेत्या म्हणून उदयास येतील यात शंका नाही जनमानसातून उमटणारा हाच सूर आहे की शिप्रा ताई यांच्यातच आम्हाला आमचे भावी आणि सुरक्षित नेतृत्व दिसत आहे शिप्रा ताईसाहेब तुम्ही जिद्दीने पुढे चालत राहिलात तर एक दिवस लोक तुमची प्रशंसा करून थांबणार नाही तर तुमच्या नेतृत्वाला साथ देतील कारण दोंडाईचे येथील भारतीय जनता पक्षामध्ये विविध स्तरांवर आणि वेगवेगळ्या कारणांमुळे अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत पर्यायी व्यवस्था नसल्याने सध्या सर्वांनी तोंडाला कुलूप लावले आहे आणि जनता तर आतुरतेने नव्या नेतृत्वाची वाट पाहत आहे सध्याच्या या राजकीय घडामोडींवर एक हिंदीची कविता आठवली चुनौतियाँ बहुत बड़ी हैं, राहें भी अनजान हैं तूफानों का ज़ोर है और मुश्किल इम्तिहान है पर तू न डगमगाना, न कभी हार मानना अपने आत्मविश्वास को ही अपनी ढाल बनाना माना कि रास्ते में काँटों का बसेरा है माना कि चारों ओर घना अंधेरा है।रुकावटें तो आएँगी तेरा हौसला आज़माने को,पर तुझमें वो ताकत है जो झुका दे ज़माने को आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button