ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावल मधील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात एड्स जनजागृती कार्यशाळा विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंध, काळजी आणि उपचारांबाबत मार्गदर्शन


भुसावळ : प्रतिनिधी गोपी अण्णा विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी जनजागृती निर्माण व्हावी, तसेच या आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारांबाबत योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सत्रात संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि दिशा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय, वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत समुपदेशिका श्रीमती ज्योती गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी ज्योती गुरव यांनी एड्स होण्याची प्रमुख कारणे, एचआयव्ही संसर्गाचा प्रसार, संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. एड्सविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आजारांबाबत भीती न बाळगता वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.एड्सविषयक जनजागृतीसोबतच सिकल सेल आणि कुष्ठरोग यांसारख्या आजारांबाबतही माहिती देण्यात आली. शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर तायडे होते. पर्यवेक्षक जी. ए. बानाईत, ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा पाटील आणि श्रीमती संगीता भंगाळे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यशाळेच्या शेवटी ज्योती गुरव यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. ए. बानाईत यांनी केले, तर एम. एस. नवगाळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button