ताज्या बातम्या

बीड जिल्हा महालक्ष्मी डेकोरेशन स्पर्धेचा भव्य निकाल सोहळा उत्साहात संपन्न


बीड (प्रतिनिधी) – अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी डेकोरेशन स्पर्धेचा निकाल समारंभ शनिवार, दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी याज्ञवल्क्य मंगल कार्यालय, नगर रोड, बीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.महिला अध्यक्षा रुपाली देशपांडे यांच्या कल्पनेने महालक्ष्मी सजावटीच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सहभागी महिलेने आपल्या कल्पकतेने आणि आकर्षक सजावटीतून महालक्ष्मीचे सुंदर स्वरूप साकारले.या स्पर्धेत सौ. प्रियंका घोळवे प्रथम, सौ. अंजली धुतेकर द्वितीय, सौ. अमृता बावळे तृतीय क्रमांक पटकावले. स्पर्धेतील विजेत्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले.हा कार्यक्रम सौ. रेखा सोनोने राष्ट्रीय सचिव यांनी महालक्ष्मी डेकोरेशन च्या स्पर्धा घेण्यासाठी खुप मोलाचे सहकार्य केले तसेच प्रोत्साहन दिले. महिला अध्यक्षा रूपाली जयंत देशपांडे, बीड तसेच सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष सौ. भागवती परदेशी, मनीषा मुंडे, कविता बडवे, कालिका कवडे, वैशाली पुरंदरे, गीता वझे, डॉ.रूपाली सुलाखे यांच्या उपस्थित संप्पन्न झाला.
महालक्ष्मी डेकोरेशनच्या माध्यमातून महिलांनी दाखवलेली कलात्मकता, पारंपरिक संस्कृतीशी असलेली नाळ आणि सर्जनशीलता निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी म्हटले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. पुढील कार्यक्रम नवरात्री उत्सव हि असाच घेतला जाईल असे महिला अध्यक्षा रूपाली देशपांडे यांनी म्हटले.
आपली कृपाभिलाषीरुपाली जयंत देशपांडे जिल्हाप्रमुख – अखिल भारतीय हिंदू महासभा महिला आघाडी, बीड.मा. संपादक साहेब
दैनिक – …………..
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून उपकृत करावे ही नम्र विनंती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button