ताज्या बातम्या

राज्यात भ्रष्टाचार करणाऱ्या वाहन निरीक्षकांना कार्य _वाहीचा दणका RTO अधिकाऱ्यांची आज चौकशी होणार गैरव्यवहार भोवणार कायद्याने दिलेल्या अधिकार क्षेत्राबाहेर कार्य केल्यामुळे सुमारे 200 निरीक्षकांचा समावेश असल्याचा परिवहन मंत्र्यांकडून अहवाल सादर करण्यात आला असून प्रत्यक्षात सादर करण्यात आलेल्या यादीतून बड्या अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याची चर्चा// निवृत्त RTO महिला अधिकारीना अर्थपूर्ण बगल दिल्याची चर्चा////// वाहन निरीक्षकच अन _फिट


महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षापासून भ्रष्टाचारी आणि चर्चित असलेला RTO विभागाचा भ्रष्टाचार कधी बंद होणार? महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त काय कार्यवाही करतील यावर जनतेचे लक्ष लागून आहे अनेक वृत्तपत्रांमध्ये न्यूज चैनल बातमी लागूनही कार्यवाही का होत नाही शेवटी परिवहन आयुक्त यांनी सांगितले कार्यवाही होणार तर पुण्यातील 4 निरीक्षकांचा भ्रष्टाचार यादीमध्ये समावेश 1) हरेश्वर पोतदार 2) वाहिद चौस 3) धनंजय पाटील 4) जयवंत पोळ तर काही बड्या अधिकाऱ्यांना वगळले चौकशी सुरू असताना काही मोठे वशिलाबाजी अधिकारी यात अडकतील असा अंदाज बांधला जात होता मात्र प्रत्यक्षात सादर केलेल्या यादीतून बड्या वशिला बाजी असणाऱ्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले त्यात एक निवृत्त महिला अधिकारी यांना सुद्धा वगळण्यात आले असून त्यांची चौकशी का नाही असा सवाल जनता करीत आहे वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन कार्य केले अशा अधिकाऱ्यांवर क** कारवाई केली जाईल अशी सूचना परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिल्या एका आठवड्याच्या आतच सर्व कार्यवाही पूर्ण करणार असे परिवहन आयुक्त व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट सांगितले असून पुढील कार्यवाही कशी होते त्याचा ग्राउंड रिपोर्ट न्यूज सिटी 85 चे संपादक निलेश पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात येईल दिनांक 19 तारखेला बुधवार रोजी झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांना सूचना दिल्या 38 A अंतर्गत वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देणे ही बाब मोटर वाहन निरीक्षकांच्या कामकाजात येत नाही तर मोटर वाहन योग्यता प्रमाणपत्र देण्याचा अधिकार प्रादेशिक व सहाय्यक उप प्रादेशिक यांच्या अधिकारात येत असल्याने मोटर वाहन निरीक्षक यांनी आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होणार अशा सूचना परिवहन मंत्र्यांनी दिल्या राज्यात फिटनेस सर्टिफिकेट परप्रांतीय राज्यातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट कसे दिले गेले याचा पुरावा मागच्या न्यूज मध्ये टाकलेला होता परिवहन विभागाने याची दखल तात्पुरती घेतली ज्यावेळेस गाड्यांचे एक्सीडेंट किंवा गाडी चेक नाक्यावर चेक केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ही बाब लक्षात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक समिती स्थापन केली आणि या समितीला वाहन तपासणीसाठी 4 महिन्याचा कालावधी दिला होता समितीने या प्रकरणात तब्बल 265 निरीक्षक व अधिकाऱ्यांची यादी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांना सादर केली या यादीमध्ये सर्वाधिक संख्या निरीक्षकांची आहे कार्यवाहीसाठी अधिकार क्षेत्र नेमून दिलेल्या असल्यावर सुद्धा अधिकारांचे उल्लंघन केल्यामुळे हा निकष ठेवला गेला यामुळे वाहन निरीक्षकांवर कार्यवाहीचा बडगा उसळणार आहे गैरव्यवहार भोवणार 38 A नुसार गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झालेले आहे या अधिकाऱ्यांना मी घरी पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील व्यावसायिक वाहनांना योग्य प्रमाणपत्र देताना मोठा गैरव्यवहार झालेला असून हा अहवाल लवकरच सादर केला जाईल आरटीओ कार्यालयात वाहनांच्या फिटनेसच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे असे न्यूज सिटी 85 संपादक निलेश पाटील यांनी मागच्या न्यूज मध्ये प्रसिद्ध केले होते तब्बल 375 अधिकाऱ्यांना दणका तर _ वाहन निरीक्षक अन _फिट निकषानुसार वाहन निरीक्षक यांच्यावर कार्यवाही होणार हे निश्चित झालेले आहे परंतु यात वशिलाबाजी होणार असल्याचेही चर्चा समोर आलेली आहे मोटार वाहन निरीक्षक व अधिकाऱ्यांना नोटीस देऊन मुदतीच्या आत आपले खुलासे सादर करावे त्यानंतरच कार्यवाही केली जाईल ज्या वाहन निरीक्षकांनी आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button