संमिश्र न्यूज जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यात अखिल भारतीय छ* संघटना पुन्हा गरजणार का? तालुका अध्यक्षपदी विशाल भाऊ पाटील यांची छ* संघटना पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली /////जिल्हा बुलढाणा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संतोष धोंडू देठे यांची बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाली
पाचोरा तालुक्यातील अखिल भारतीय छ* संघटना पुन्हा गरजणार का? पाचोरा तालुक्यातील एक काळ असा होता की अखिल भारतीय छ* संघटनेने सगळीकडे मराठा चळवळ उभी केली परंतु गेल्या महिन्यापूर्वी छ* संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांचे दिनांक 5 फेब्रुवारी 2013 निधन झाले त्यांच्या जाण्यामुळे संघटनेमध्ये उणीव भरून काढण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले त्यामागे महत्त्वपूर्ण कारण अण्णासाहेबांच्या जाण्याने अखिल भारतीय छ* संघटना पोरखी झाली जे पूर्वी काम होते त्या कामांमध्ये आणि आजच्या कामांमध्ये फार फरक पडला छ* नाव ऐकताच दुश्मनांचा काळजाचा ठोका पडत होता इतकी दहशत त्यावेळेस छ* संघटनेने तयार केली होती विशाल भाऊ पाटील यांची संघटनेमध्ये पाचोरा तालुका अध्यक्ष निवड झाली त्याबद्दल अखिल भारतीय छ*** संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
संतोष देठे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
जिल्हा बुलढाणा तालुका शेगाव : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संतोष धोंडू देठे यांची बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बावस्कर यांच्या स्वाक्षरीने देठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्तीपत्रानुसार, दि. 29 ऑगस्ट 2026 पासून पुढील आदेश होईपर्यंत ही नियुक्ती लागू राहणार आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा जनहितासाठी वापर, तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी देठे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.भारतीय संविधान, भारतीय कायदे तसेच महासंघाच्या आचारसंहितेचे पालन करून पदाची जबाबदारी पार पाडण्याचे निर्देशही नियुक्तीपत्रात देण्यात आले आहेत.या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात माहिती अधिकाराबाबत जनजागृती व नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या उपक्रमांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.












