एका मागोमाग //RTO विभागातील मुळापासून भ्रष्टाचार पोखरून काढणारे कलमवीर आमचे मित्र दैनिक धुळे मैदानाचे संपादक नथूभाऊ गुजर/ NEWS CITY 85 चैनलचे संपादक निलेश पाटील यांनी प्रत्येक घडामोडीची RTO विभागातील न्यूज लावल्यामुळे RTO विभागात एकच खडबड उडाली आहे आज पावसाळी अधिवेशनात RTO अधिकाऱ्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असून सहकार्य न करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर एसीबी ट्रॅप लावून अटक केली जाते, विरोधी पक्ष/ काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

15 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची SIT चौकशी करा आणि कठोर कारवाई करा वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात लगेच घोषणा केली दोशींवर कठोर कार्यवाही होणार RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत चौकशी, यातील दोषींवर कठोर कारवाई होणार मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा मुंबई, दि. 7 पावसाळी अधिवेशन विधानसभेत RTO विभागातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्या ऑडिओ क्लिप्स सभागृहात मांडल्या विधानसभेत प्रश्नोत्तर काळात वडेट्टीवार यांनी RTO विभागातील रॅकेट आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोपही त्यांनी केला. परिवहन विभागात संघटित वसुली रॅकेटची कार्यपद्धती वडेट्टीवार यांनी मांडली. या रॅकेट मधील अधिकाऱ्यांना १५ वर्षाहून अधिक काळ विदर्भात पोस्टिंग देण्यात आली आहे.बजरंग खरमाटे (निवृत्त RTO अधिकारी)रविंद्र भुयार (प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला)राजू नागरे (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, अमरावती)आनंद मोहोड (मोटार वाहन निरीक्षक, गोंदिया)योगेश खेसनार (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, खामगाव) हे अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करतात. इतकचं नाही तर वसुलीला नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. ट्रान्सपोर्टरमार्फत तक्रारदार उभे केले जातात. ACB ट्रॅपसाठी नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती निर्माण केली जाते अशा अधिकाऱ्यांना अडकवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी सभागृहात केला. याबाबतच्या ऑडिओ क्लिप देखील वडेट्टीवार यांनी अध्यक्षांना सादर केल्या. महाराष्ट्राचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून करचुकवेगिरी होत असल्याचा आरोप केला.यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीची घोषणा केली. IPS अधिकारी प्रियका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. परिवहन मंत्री यांनी RTO घोटाळ्यात तीन सदस्यीय SIT एका महिन्याच्या आत अहवाल सादर करेल सभागृहात वडेट्टीवार यांनी घेतलेल्या सर्व नावांची आणि आरोपांची चौकशी केली जाईल.सेवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल तपासणी केली जाईल चौकशी अहवालानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अस परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.RTO विभागातील कथित भ्रष्टाचाराचे रॅकेट कायमचे उध्वस्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
तसेच, महाराष्ट्रातील वास्तव्यास असूनही इतर राज्यांत वाहन नोंदणी करून करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा विचार सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. वाहन नोंदणीवेळी कर्ज, राहण्याचा पुरावा आणि GST पडताळणीसारख्या बाबींची काटेकोर तपासणी करण्याची प्रक्रियाही मजबूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.सरकारने चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.














