ताज्या बातम्या

लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारे कोणीही बातमी न्यूज दिली की लगेच आपल्या चैनलच्या माध्यमातून नेहमी लावत असतात कोणतीही अपेक्षा न बाळगता असे आमचे परममित्र मनमिळाऊ स्वभावाचे आपुलकीने वागणारे आमचे मित्र प्रमोद भाऊ बारी यांचे पाचोरा पत्रकार संघातर्फे अभिनंदन


पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचा अभिमान असलेले, जनलक्ष्य न्यूजचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला.यशवंत सेना महाराष्ट्र राज्य व जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि विविध जनहिताच्या उपक्रमांत सातत्याने केलेल्या योगदानाची दखल घेत प्रमोद बारी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, राजकीय, पत्रकार आणि सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button