महाराष्ट्रात 5 स्टार सीबीएसइ इंग्लिश मीडियम खाजगी शाळांची मनमानी क्षमतेपेक्षा जास्त फी वसूल ट्युशनची सक्ती शिक्षण विभाग लक्ष देणार का? देश स्वतंत्र झाला खाजगी _करणासाठी नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचव _ण्यासाठी बहुजन महापुरुषांनी देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी काय नाही केले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आज त्याचे फळ चांगले मिळायला पाहिजे होते परंतु फार विचित्र स्वरूपाचे खाजगीकरण झाल्यामुळे जनतेला त्याची फळे भोगावे लागत आहे

महाराष्ट्र राज्यात खाजगी शिक्षण व्यवस्थेत नेमके काय सुरू आहे पालकांनी केलेला आरोप खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा करणार का महाराष्ट्र शिक्षण मंत्री याची सखोल चौकशी करून पारदर्शकता आणण्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची आणि शिक्षण विभागाची आहे आता सध्या महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात खाजगी शाळांचे मुद्दे सरकारी शाळा बंद करीत आहे कृषीप्रधान देशात शेतकरी विषयी महत्वपूर्ण मुद्दे घेतले पाहिजे खाजगीकरणातून देशाचा विकास होणार का? महाराष्ट्रात 5 स्टार सीबीएसइ इंग्लिश मीडियम शाळांची मनमानी सुरू असून त्याला आवर कोण घालणार पालकांच्या म्हणण्यानुसार काही शाळा कडून ट्युशन लावली नाही तर तुमच्या मुलाला अभ्यासात अडचणी येतील किंवा तो उत्तीर्ण होणार नाही अशा प्रकारची भीती दाखवली जात असल्याचे चित्र समोर दिसत आहे महाराष्ट्रात काय संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीची समस्या त्या शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुण संपूर्ण वडिलांचा पैसा खर्च करून काही नोकरीला लागले परंतु आयटीमध्ये लागलेले त्या तरुणांची परिस्थिती काय// आयटी कंपन्या एका रात्री मधून बंद होतात आणि चार चार महिन्याचा थकलेला पगार करणार काय//आधीच तर महागाईमुळे पालक वर्ग त्रस्त झाला पालक वर्ग आर्थिक दृष्टिकोनातून कुठे कुठे लक्ष देणार काही शहरातील सीबीएसइ शाळांमध्ये वार्षिक शिक्षण शुल्क सुमारे 40 हजार रुपये त्याशिवाय 20 हजार ट्युशन फी तसेच वर्षभर विविध सांस्कृतिक क्रीडा व इतर कार्यक्रमाच्या नावाखाली शुल्क आकारले जातात एका मुलाच्या शिक्षणावर दरवर्षी एवढा पैसा लागला तर पालक वर्गांनी आणावा कुठून देशातच बेरोजगारी असल्याने सरकारी कंपन्या दिवसेंदिवस बंद पडत असून आर्थिक सोर्स कमी होत चालला आणि शिक्षणाचा खर्च वाढत चालला पालकांचा प्रश्न असा आहे की जर शाळेतच दर्जेदार शिक्षण दिले जात असेल तर त्याच विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र ट्युशन फी घेण्याची गरज काय? शिक्षणासाठी भरघोस शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त खर्चाचा बोजा पालकांवर का टाकला जातो अशी विचारणा पालक वर्ग करीत आहे अनेक मराठी शाळा बंद करून सरकारने जनतेला कोणता धडा शिकवणार आहे?? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे शिक्षण मंत्री जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे का? असा सवाल पालक वर्ग करीत आहे शाळांच्या शुल्क संरचनेची ट्युशनच्या सक्तीची आणि विविध शुल्कांची वसुली याची चौकशी करून दोशींवर कार्यवाही करावी अशी पालक वर्गाकडून मागणी होत आहे











