जळगावकरांसाठी शेवटची संधी : पुढील १२ दिवसात मालमत्ता कर भरा, शास्तीत १००% माफी घ्या.!महापौर दीपमाला काळे यांच्या पत्रानंतर प्रशासनाकडून योजनेला शेवटची मुदतवाढ अभय शास्त्री योजनेत झालेली एकूण वसुली गेल्या पंधरा दिवसात 12 कोटी 41 लाख रुपये

जळगावकरांसाठी शेवटची संधी : पुढील १२ दिवसात मालमत्ता कर भरा, शास्तीत १००% माफी घ्या.!महापौर दीपमाला काळे यांच्या पत्रानंतर प्रशासनाकडून योजनेला शेवटची मुदतवाढ जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता धारकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, थकीत करावरील शास्तीमध्ये (दंड) १००% सवलत देणारी ‘अभय योजना’ जाहीर केली होती. महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने मालमत्ताधारकांना आता या योजनेसाठी पुढील १२ दिवसांची मुदतवाढ दिली असून ही शेवटची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.योजनेचे स्वरूप आणि कालावधी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे. मालमत्ता कराची मूळ रक्कम भरणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये सवलत मिळेल. कालावधी: २० मार्च ते ३१ मार्च असून थकीत शास्तीमध्ये १००% पूर्ण माफी आहे.महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकां वरील दंडाचा बोजा कमी करण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला आहे. ही शास्ती माफीची शेवटची मुदतवाढ असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपला मालमत्ता कर त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.भरणा करण्याची सुविधा नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिकेच्या jalgaonmc.org या संकेतस्थळावर किंवा देयकावरील QR Code स्कॅन करून UPI, Net Banking द्वारे भरणा करता येईल. महापालिका कार्यालयात धनादेश किंवा डी.डी. द्वारे पैसे स्वीकारले जातील. तसेच महापालिका कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊनही वसुली करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे अनिवार्य आहे. ज्यांनी यापूर्वीच शास्ती भरली आहे, त्यांना कोणताही परतावा मिळणार नाही. नुकसान भरपाईची मागणी केलेल्या मालमत्तांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.








