ताज्या बातम्या

राज्य सरकारचा अजब निर्णय महाभ्रष्टाचारी आरटीओ यांना पदोन्नती याचा अर्थ असा होतो की भ्रष्टाचार करणाऱ्याला पदोन्नती आणि शाबासकी भेटते आतापर्यंत आरटीओ विभागातील अतिरिक्त आयुक्त भरत कळस्कर यांनी 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी 50 लाख रुपये मागितले त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करण्यात हे सरकारने स्पष्ट करावे माजी आमदार अनिल परब सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळणार?


महाराष्ट्र मुंबई मंत्रालय राज्याच्या परिवहन विभागात भ्रष्टाचाराने माजलेल्या भ्रष्ट अधिकारी भरत दिनकर कळसकर यांच्यासह दोघाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना राज्य शासनाने पदोन्नती दिली आणि त्यांना परिवहन विभागामध्ये सहआयुक्त पदावर नियुक्ती केली याचा अर्थ जो जास्त भ्रष्टाचार करत त्याला पदोन्नती आणि बक्षीस केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार पर्यंत मिळताना स्पष्ट दिसत आहे भ्रष्टाचारास कसा पाठिंबा मिळतो याचे उदाहरण याबाबत सविस्तर वृत्त 31 डिसेंबर 2025 रोजी शासनाकडून एक जीआर काढून त्या जीआर मध्ये भरत दिनकर कळसकर रवींद्र गायकवाड शैलेश कामत मेश्राम यांना परिवहन कार्यालयात सहआयुक्त या पदावर पदनियुक्त केले आहे राज्य शासनाच्या यादीमध्ये रवींद्र गायकवाड शैलेश कामत व इतर आतापर्यंत त्यांनी सेवा केलेल्या कामामध्ये प्रामाणिकता दाखविली असे प्रमाणपत्रात स्पष्ट झाले असे दिसून येते यांनी बढती मिळवली असली तरी त्यांच्या मागील कामांचा तपशील आजही पुसला गेलेला नाही भरत कळसकर महाराष्ट्र धुळे नाशिक राज्यातील ज्या ज्या ठिकाणी यांनी ड्युटी केली त्या ठिकाणी त्यांच्या भ्रष्टाचाराची आणि त्याचबरोबर परिवहन विभागाची लक्तरे आजही जशीच्या तशी आहे त्यांचा भ्रष्टाचार वेशीला टाकलेला आहे असा सवाल जनता करीत आहे भरत कळसकर ज्या ठिकाणी ड्युटीला होते त्या ठिकाणी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा ऐकायला मिळतात आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्या बातम्यांचा शोध घेऊ मागील बातम्यांमध्ये हा विषय मांडलेला होता काही ठिकाणी त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशी बाबत ही त्यांना थेट जेरबंद करेल का? जनतेला न्याय मिळेल का त्यांच्या विरोधात अनेक जण न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले असून तारीख पे तारीख सुरू आहे अशा महाभ्रष्ट अधिकाऱ्यांची पदोन्नती कशी काय झाली असा सवाल मा; परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत प्रश्न अधिकाऱ्यांबाबत कुंडली मांडली कळसकर व इतर अधिकारी कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात सगळं स्पष्ट लेखी जबाब दिला यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला याचा सगळा लेखाजोखा मांडला आणि परिवहन विभागामध्ये नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे धडे पाढे कसे शिकवतात याबाबत परब यांनी पेन ड्राइव मध्ये सगळी माहिती माननीय सभापती राम शिंदे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या या तक्रारीच्या अनुषंगाने काही खोटे असल्यास माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असे स्पष्ट आव्हान माजी आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले मात्र गेंड्याची कातडी पांघरून झोपलेले सरकार यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही यावरूनच दिसून येते विरोधी पक्षाचे आमदार यांच्या महत्वपूर्ण मुद्द्यावर सरकार एक शब्द बोलत नाही तर सामान्य माणसाची काय किंमत करतील याचा अंदाज आपण करावा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button