जिल्हा जळगाव तालुका भुसावळ येथे माँ काली मंदिरात 501 दीप_ प्रज्वलनासह 111 घटांची स्थापना बालयोगी गेंदानाथ महाराज यांचा 15 ते 16 वर्षांपासून नवरात्रातील धार्मिक उपक्रम; शहराच्या सुख_ समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थना

भुसावळ प्रतिनिधी : गोपाल अण्णा नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीची आराधना भक्ती आणि श्रद्धेचा जागर याच भक्तिमय वातावरणात भुसावळ शहरातील माँ काली मंदिरात बालयोगी गेंदानाथ महाराज यांच्या हस्ते 501 दिवे आणि 111 घटांची स्थापना करण्यात आली शहरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी प्रत्येकाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना यावेळी माँ कालीच्या चरणी करण्यात आली.बालयोगी गेंदानाथ महाराज हे गेल्या 15 ते 16 वर्षांपासून नवरात्रोत्सवात घटस्थापनेचा धार्मिक उपक्रम श्रद्धेने आणि सातत्याने राबवत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातून त्यांची देवीवरील निष्ठा आणि धार्मिक परंपरेप्रती असलेली आस्था दिसून येते माँ काली मंदिरात 501 दिवे आणि 111 घटांच्या स्थापनेमुळे नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात भर पडली दीप _प्रज्वलनातून श्रद्धेचा प्रकाश आणि घटस्थापनेतून शक्तीस्वरूपा देवीची आराधना करण्यात आली. नवरात्राच्या या पवित्र पर्वात देवीने सर्वांना सुख समाधान आणि उत्तम आरोग्य द्यावे तसेच समाजात एकोपा व शांतता कायम राहावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा धार्मिक उपक्रम नवरात्रोत्सवातील श्रद्धेची परंपरा जपणारा ठरत आहे माँ कालीच्या भक्तीने आणि देवीच्या जयघोषाने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांसाठी हा उपक्रम विशेष श्रद्धेचा विषय ठरला आहे












