ताज्या बातम्या

BIG_ BREAKING NEWS मिथुन बारसे, क्रिश बारसे व करण यांच्या हत्येसाठी 35 लाखांची सुपारी; कट उधळला, पाच गुंडांना अटक!भुसावळच्या दुहेरी हत्याकांडातून बदला घेण्याचा कथित डाव; जळगावात शस्त्रांसह पाच जण ताब्यात, 62 ग्रॅम एमडी ड्रग्जही जप्त


जळगाव : प्रतिनिधी गोपी अण्णा भुसावळ येथील दुहेरी हत्या _कांडाचा बदला घेण्यासाठी मिथुन बारसे, क्रिश बारसे व करण यांची हत्या करण्याकरिता ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. या कथित हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, संभाव्य गँगवार आणि गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच कट उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या कारवाईत गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, मोबाईल संच आणि वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या घरझडतीत 62 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थही हस्तगत करण्यात आला आहे. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या 12 ऑक्टोबर 2026 रोजीच्या प्रेस नोट क्र.179 नुसार, भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे व करण यांची हत्या करण्यासाठी 35 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात पुढे आली. यापैकी पाच लाख रुपये आगाऊ दिल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. मध्यरात्री हल्ल्याची योजना; पोलिसांचा सापळापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेण्याची तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याची कथित योजना आखण्यात आली होती.या संदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पिंप्राळा परिसरातील भवानी माता मंदिर ते सिल्क मिल्ससमोरील मोकळ्या जागेत सापळा रचला. तेथे इनोव्हा कारवर छापा टाकून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे नियोजित हल्ल्याचा कट उधळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.पाच आरोपी अटकेत या प्रकरणात पोलिसांनी खुशाल गजानन बारसे (रा. खडक रोड, भुसावळ), संदीप बबन लोढे (रा. वाहननगर, जळगाव), राणू ऊर्फ ओंकार भद्रगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशीम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) यांना अटक केल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. दोन गावठी कट्टे, सात काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल संच आणि एक इनोव्हा कार असा एकूण एक लाख 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हत्येच्या कथित कटासाठी शस्त्रांची जमवाजमव करण्यात आली होती का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत घर झडतीत 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता उमाळा (ता. जळगाव) येथील एका खोलीत अमली पदार्थ लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पंचांसमक्ष घरझडती घेण्यात आली. या वेळी 62 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी पावडर) आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची किंमत दोन लाख 22 हजार 300 रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तीन लाख 99 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.फरार बंटी आणि शिव पथरोडचा शोध सुरू?प्रेस नोटमध्ये बंटी परशुराम पथरोड आणि शिव परशुराम पथरोड यांची नावे अनुक्रमे 11 आणि 12 गुन्ह्यांच्या नोंदींसह नमूद आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हे दोघे या प्रकरणात फरार असल्याचेही प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 29 /2/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावीत यांनी दिली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button