ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव भडगाव तालुक्यातील शेतकरी सहकारी संघावर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली


भडगाव (प्रतिनिधी) विजय माळी
येथील शेतकरी सहकारी संघ लिमिटेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी जयवंत विक्रम पाटील (अंजनविहरे) आणि उपाध्यक्षपदी प्रभाकर शामराव पाटील (वलवाडी) यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब महाले (सहाय्यक निबंधक, पारोळा) यांनी घोषित केले. राजेंद्र परदेशी यांनी अध्यक्षपदाचा, तर हिरामण पाटोळे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागांसाठी ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. या सभेला आमदार किशोर पाटील उपस्थित होते. तसेच संचालक राजेंद्र परदेशी, हिरामण पाटोळे, भैय्यासाहेब पाटील, देविदास माळी, खुमानसिंग पाटील, अम ोल सुरेश पाटील, अमोल नाना पाटील, जयवंत पाटील, गुलाब पाटील, रायचंद परदेशी, भीमराव पाटील, नागेश वाघ, शांताराम पाटील आणि संचालिका योजना पाटील उपस्थित होते. याशिवाय भडगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक युवराज पाटील, दुर्गे श वाघ, माजी अध्यक्ष नगराज पाटील, डी. डी. पाटील, सुधाकर पाटील, अंजनविहरे येथील आनंदा पाटील, बापुराव पाटील, शशिकांत पाटील, संभाजी पाटील, बाळू पाटील, ध्रुवराज पाटील, जालिंदर पाटील, तसेच वलवाडी येथील शामराव पाटील, बाबाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी सभासद व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button