ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ता; पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील ऐतिहासिक सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना बहुजन समाजाकडून हाय अपेक्षित होतं ते आज नवीन दांपत्याने सत्यशोधक पद्धतीने विवाह करून दाखवल भारत देशात इंग्रजांचे राज्य सुरू असताना बहुजनांना शिक्षणासाठी इंग्रज सरकारकडे पहिले पत्र देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज आपले वडील आजोबा यांना शिक्षण मिळाले महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज निर्माण केला सत्यशोधक म्हणजे काय? सत्याचा शोध घेणारे त्यांना सत्यशोधक म्हणतात महात्मा फुलेंनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानले महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतात सर्वप्रथम बहुजनांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले


जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात ऐतिहासिक सत्यशोधक विवाह.. श्रीमती प्रमीला पोपट महाजन यांचा चि. प्रमोद महाजन यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव येथील ज्ञानेश्वर गोविंदा माळी यांची सुकन्या चि. सौ. कां. अश्विनी यांचा पाचोरा तालुक्यातील हा पहिला ऐतिहासिक सत्यशोधक विवाह रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी म्हणजेच जागतीक महिला दिवस या दिवशी सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार विवाह संपन्न झाला. सत्यशोधक विवाह पद्धती स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांना बळ देण्याबरोबरच सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना महत्व देणारी आहे. या सत्यशोधक विवाह पद्धतीचा महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पाया घातला. या सर्व गोष्टी विचारात घेऊन चि. प्रमोद आणि अश्विनी या समतेच्या वाटेने घेऊन जाणाऱ्या विवाह पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि ८ मार्च २०२६ रोजी हा विवाह पाचोरा येथे चाळीसगाव येथील विधिकर्ते भगवान रोकडे यांनी संपन्न केला. या विवाह प्रसंगी सत्यशोधक समाज संघास रू. १५०१ रू. सहयोग निधी दिल्याबद्दल या नवदांपत्याचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद….! हा ऐतिहासिक सत्यशोधक विवाह घडवून आणल्याबद्दल नवदांपत्याचे पाचोरा शहरासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button