न्याय देणारे न्यायाधीश लाज प्रकरणात अडकले मुंबई एसीबीची कार्यवाही लिपिक अटकेत 15 लाखाची लाच घेताच न्यायाधीशांना लिपिकाचा फोन न्यायाधीशांवरही गुन्हा शेवटी बहुजन महापुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले होते न्यायव्यवस्था ही जनतेच्या विरोधात कार्यक्रम करीत आहे त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं पण ते स्वातंत्र्य आमचं बहुजनांचं नाही म्हणूनच दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 ला 60000 महिला व पुरुषांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर अण्णाभाऊ साठे घेऊन गेले आणि म्हणाले यह आजादी जुटी है देश की जनता भूखी है लुटेरों के चांदी है! आज पण तेच घडत आहे समोर दिसतय

मुंबई न्यायालयात सुरू असलेला खटला आपल्या बाजूने लावून देण्यासाठी 25 लाख रुपयाची लाच मागणारा लिपिकाला मुंबईच्या एसीबी विभागाने 15 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले धक्कादायक वृत्त असे की लाज स्वीकारलेल्या त्या लिपिकाने फोन करून रक्कम मिळाली अशी माहिती दिली या घटनेमुळे सर्वच न्यायाधीश वर्तुळात एकच खळवळ उडाली अटक केलेल्या लिपिकाचे नाव चंद्रकांत हनुमंत वासुदेव वय वर्ष 40 त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर न्यायाधीश एजाज उद्दीन सलाउद्दीन काझी वय वर्ष 55 यांच्यावरही भ्रष्टाचार अंतर्गत कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे वाद मुंबई उच्च न्यायालयात 2015 पासून सुरू होता तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची मालकी असलेली जागा जबरदस्ती ताब्यात घेतल्याने 2015 पासून न्यायालयात वाद सुरू होता 2024 मध्ये ही केस उच्च न्यायालयातून माझगाव सत्र न्यायालयात वर्ग झाली त्यानंतर 9 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार न्यायालयात आला असता लिपिक वासुदेवने त्याच्याशी संपर्क साधला त्याने सांगितले की जज्ज साहेबांच्या माध्यमातून तुमचा निकाल तुमच्या बाजूने लावून देऊ त्यासाठी तुम्हाला 25 लाख रुपये द्यावे लागतील नंतर कमी जास्त होऊन 15 लाखांमध्ये ठरले त्यामध्ये 10 लाख रुपये साहेबांचे आणि 5 लाख रुपये माझे त्यानंतर वासुदेव याने तक्रारदाराला नेहमी फोन करून काय झालं पैशांचं पैसे लवकर जमा करा एवढी मोठी रक्कम देणे तक्रारदाराला शक्य नव्हते म्हणून तक्रारदाराने 10 नोव्हेंबर 2025 रोजी एसीबी कडे तक्रार दाखल केली त्यानंतर कार्यवाही सक्सेस होण्यासाठी एसीबीने रचला सापळा त्यानुसार 11 नोव्हेंबर रोजी पैसे देण्याचे ठरले आणि सापळा यशस्वी 15 लाख रुपये लाज घेताना रंगेहात पकडला लिपिक वासुदेव एसीबीच्या जाळ्यात सापडला त्याला अटक झाली आणि अटकेनंतर त्याने लागलीच अतिरिक्त सत्र न्यायाधीश काझी यांना फोन करून सांगितले पैसे मिळाले न्यायाधीश काझी यांनी त्यावर संमती दिल्याचे वायरलेस रेकॉर्ड वरून स्पष्ट झाल्याचे निष्पन्न झाले आता या प्रकरणात दोघांच्या घरझडतीसाठी एसीबीने मागणी केली आहे तपास वेगात सुरू असून या अगोदरही अनेक ठिकाणी न्यायाधीश लाच प्रकरण झालेले आहेत हा गुन्हा गंभीर असून देशद्रोही गुन्हा आहे मागील वर्षी साताऱ्यातही एसीबीने जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अन्य 3 जणानवर 5 लाखाच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे







