ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्षस्थापना सोहळ्याची शिस्तबद्ध व प्रेरणादायी सुरुवात : रोटेरियन डॉ. मुकेश तेली नवे अध्यक्ष तर सचिव डॉ अजयसिह परदेशी, सामाजिक सेवा कार्याचा घेतला नवा संकल्प


पाचोरा – “सेवा हेच आपले व्रत” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला धरून रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणीच्या पदस्थापनेचा सोहळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते रोटरी सदस्य मान्यवर पाहुणे, आणि पाचोरा-भडगाव परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे सन्माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे यांची उपस्थिती त्यांच्या हस्ते रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी सचिवपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली रोटरीच्या नव्या वर्षाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थापना सोहळ्यात प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात रोटरी चळवळीच्या सामाजिक भानाविषयी विवेचन करताना शैक्षणिक आणि मूल्याधिष्ठित सेवाकार्याचा संदर्भ दिला रोटरी क्लब पाचोरा-भडगावने सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे हे त्यांनी अधोरेखित केले अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या मनोगतातून समाजात रोटरीच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या संकल्पाची मांडणी केली “रोटरी ही केवळ संस्था नसून एक चळवळ आहे या चळवळीच्या प्रत्येक घटकाने वैयक्तिक जबाबदारीने समाजात बदल घडवण्यासाठी झटले पाहिजे,” असे ते म्हणाले. तर नवनिर्वाचित सचिव रोटेरियन डॉ. अजयसिंग परदेशी यांनी संयोजक म्हणून आगामी वर्षात अधिक व्यापक प्रभावी आणि सहभागी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. पवन पाटील यांनी केले. त्यांनी २०२४-२५ या वर्षात क्लबने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा दिला आणि सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले त्यांच्या कार्यकाळात सामाजिक आरोग्य शिबिरे वृक्षारोपण मोहिमा ग्रामीण शाळांना मदत युवावर्गासाठी करिअर मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले तसेच मावळते सचिव रोटेरियन शिवाजी शिंदे यांनी संयोजन आणि नियोजन यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक झाले क्लबच्या कार्य काळातील अभूतपूर्व योगदानाबद्दल दोघांनाही यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले या भव्य कार्यक्रमास डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर किरण देशमुख यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यांनी अध्यक्षस्थापना सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करत रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या कार्यशैलीची प्रशंसा केली या कार्यक्रमाची यशस्वीता ही केवळ नवीन अध्यक्ष आणि सचिव यांच्या नेतृत्वानेच नव्हे तर संपूर्ण रोटरी कुटुंबाच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झाली या निमित्ताने रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अनेक सदस्य माजी पदाधिकारी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले विशेषतः भाईसाहब अग्रवाल निलेश कोटेचा संजय कोतकर चंद्रकांत पाटील सौ. उदावंत मॅडम भरत सिनकर, चंद्रकांतजी लोडाया सुयोगभाई जैन डॉ. अमोल जाधव डॉ. बाळकृष्ण पाटील डॉ. प्रशांत सांगडे डॉ. घनश्याम चौधरी डॉ. पंकज शिंदे डॉ. सिद्धांत तेली प्रज्ञेश खिलोशिया डॉ. किशोर पाटील आणि डॉ. विशाल पाटील गिरीश दुसाने तहसीलदार श्री बनसोडे साहेब मुख्याधिकारी साहेब श्री मंगेश देवरे पोलिस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब डॉ.नितीन जमदाडे डॉ.राहुल काटकर डॉ.तौसिफ खाटीक सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन तायडे डॉ.मुकेश राठोड डॉ.विजय पाटील शिंदे इंटरनेशनल स्कूलचे प्रिंसिपल श्री विजय पाटील सर होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विशाल पाटील डॉ.हृषिकेश चौधरी डॉ.अभिषेक जगताप डॉ.संकेत विसपुते डॉ .प्रवीण माळी डॉ.स्वप्नील पाटील रावसाहेब पाटील सर व इतर सर्व रोटेरियन महिला सदस्य तसेच सम्मानीय रोटेरियन सदस्य तसेच पदाधिकारी हे जळगाव अमरावती नाशिक व चाळीसगाव येथून ही उपस्तीत होते सदस्यांचा उल्लेख करत नव्या कार्यकारिणीने विशेष आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीआयोजनासाठी संयोजन समितीने अतिशय काटेकोर नियोजन केले होते या संपूर्ण सोहळ्याला अनुशासन वेळेची पाळी आणि आदरयुक्त वातावरण या गोष्टींनी अधिकच भारदस्त रूप दिले कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची आणि संगीताचा आस्वाद घेता येईल अशा संगीतमय वातावरणाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती त्यासाठी जबाबदारी पार पाडणाऱ्या केटरिंग आणि डीजे टीमचेही मनापासून आभार मानण्यात आले आजचा दिवस रोटरी क्लब पाचोरा भडगावसाठी एक सन्मानाचा प्रेरणादायी आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे अध्यक्ष रोटेरियन डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या उत्साहवर्धक भाषणातून संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी देण्याची भूमिका मांडली आणि सेवाभावाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाने ‘सेवा हेच आपले व्रत’ ब्रीदवाक्याला साजेसा भाव आणि कृती दिली समाजात सकारात्मकता पसरवणे गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे युवा पिढीला दिशा देणे आणि आरोग्य शिक्षण पर्यावरण यांसारख्या मूलभूत क्षेत्रांत रोटरीची प्रभावी उपस्थिती दिसून येणे हेच खरे यश आहे आजचा सोहळा ही पुढील सेवाभावाच्या वाटचालीसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे या अध्यक्षस्थापना कार्यक्रमातून नवीन कार्यकारिणीने एक नवा अध्याय सुरू केला आहे या अध्यायाचे प्रत्येक पान समाजहिताच्या कार्याने भरलेले असेल अशी खात्री सर्व उपस्थित रोटेरियन बांधवांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांचे आभार मानत पुढील काळात रोटरीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button