प्रजासत्ताक भारतात प्रजेचे राज्य आहे का? भटक्या विमुक्तांचे राष्ट्रीय नेते मा.डॉ.अनिल माने यांचे विचार येत्या रविवारी जि; जळगावातील असंख्य ओबीसी ऐकण्यासाठी इच्छुक दि.२६ जानेवारी २०२५ रविवारी ११ ते ४ पद्मावती मंगल कार्यालय पंचमुखी हनुमान मंदिराजवळ

भटक्या विमुक्तांचे राष्ट्रीय नेते मा.डॉ.अनिल माने यांचे विचार येत्या रविवारी जळगावातील असंख्य ओबीसी ऐकण्यासाठी इच्छुक दि.२६ जानेवारी २०२५ रविवारी ११ ते ४ या वेळेत पद्मावती मंगल कार्यालय पंचमुखी हनुमान मंदिराजवळ जळगाव येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रजासत्ताक भारतात प्रजेचे राज्य आहे का? या विषयावर या कार्यक्रमात गंभीरपणे चिंतन होणार आहे या चिंतन शिबीराचे केंद्रबिंदु आहेत भटक्या विमुक्तांचे राष्ट्रीय नेते डॉ.अनिल माने कर्पुरी ठाकुर यांची जयंती साजरी आज जळगावात बिहारचे मा.मुख्यमंत्री व ओबीसींचे आधारवड स्मृतीशेष भारतरत्न कर्पुरी ठाकुर साहेब यांची जयंती जळगाव शहरातील सैनी(नाभिक) बांधवांनी आयोजित केली होती या प्रसंगी सुमित्र अहिरे राज्य मुख्य कार्याध्यक्ष बामसेफ देवानंद निकम जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा खुशाल सोनवणे शहर सचिव बीएमपी यांनी जयंती समारंभात उपस्थिती या मान्यवरांनी नोंदवविली मते या प्रसंगी नाभिक समाजाचे नेते मा.देविदास फुलपगारे साहेब मा.बंटीभाऊ नेरपगारे मा.मनोहर खोंडे सर राजकुमार गवळी साहेब यांनी कर्पुरी ठाकुर साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला सुमित्र अहिरे यांनाही विचार व्यक्त करण्याची संधी आयोजकांनी दिली आपले मत व्यक्त करताना कर्पुरी ठाकुर साहेब व सध्या ओबीसी समाजाची दिशा व दशा या विषयावर मत व्यक्त केले.उपस्थित सर्वजण प्रभावित झाले डॉ.अनिल माने यांना ऐकण्यासाठी ओबीसी मोठ्या संख्येने येणार २६ जानेवारी २०२५ च्या प्रबोधनात्मक कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन करताच सर्व ओबीसी बंधु व भगिनी डॉ.अनिल माने यांना ऐकण्यासाठी येतील व उभारण्यात येत असलेल्या लढ्यात एकत्रितपणे शामील होतील असे आश्वासन दिले








