अजून किती दिवस अंदाधुंदी चालणार आरटीओ खात्यात दिव्याखाली अंधार मुदत संपलेल्या वाहनातून मोटार वाहन निरीक्षकासमोर टेस्ट ड्राईव्ह
जळगाव जिल्ह्यात अजूनही आरटीओ खात्यात अनेक वर्षापासून एवढा भ्रष्टाचार सुरू असून रोज काही ना काही काळे गोरे कार्यक्रम जिल्ह्यातील आरटीओ करीत आहे रोज नवीन एक भ्रष्टाचार कुठून तरी पैसा कसा येईल हे शोधून काढत आहे जनतेला नियमांचा डोस पाजून जिल्हाभर वाहन चालकाला दंड देणाऱ्या आरटीओ प्रादेशिक वाहन विभाग भ्रष्टाचाराचा विळख्यात असून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मोहाडी येथील मैदानावर वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी चाचणी घेतली जात असलेले वाहनच मुदतबाह्य असल्याचा प्रकार समोर आला या महत्वपूर्ण विषयावर झोल होत असल्याचे निदर्शनात आले जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात भ्रष्टाचारा संबंधित नेहमी न्यूज लागत असतात आरडा ओरडा होतो आणि कार्यवाही काही होत नाही जिल्हाधिकारी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करीत आहे न्यूज जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचतात कार्यवाही का नाही याला जबाबदार कोण? डिसेंबर महिन्यातच आरटीओ पाटील व त्यांचा पटर तीन लाखाची लाच घेताना रंगेहात औरंगाबाद लाखलुपत विभागाने अटक केली होती त्यामुळे जळगाव आरटीओ हे पद रिक्त असल्यामुळे धुळे येथील आरटीओ अशोक पवार यांच्याकडे जळगाव आरटीओचा अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे एवढे मोठे दोन जिल्हे सांभाळणे अशोक पवार यांना कठीण जात आहे का? मुदतबाह्य वाहनातून टेस्ट ड्राईव्ह नवीन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन परवाना व नूतनीकरण करण्यासाठी मोहाडी शिवारात चाचणी घेतली जाते संस्थेच्या कार्यक्षेत्रात मुदत संपलेल्या वाहनातून टेस्ट ड्राईव्ह घेण्याचा कार्यक्रम आरटीओ ऑफिस कार्यालय यांच्या अधिकारी घेत आहे हे किती हुशार व कार्यदक्ष आहेत यावरून हे नेमके करतात तरी काय असा प्रश्न फक्त तिसरा डोळा सोशल मीडिया असणारा पाहू शकतो जनतेला प्रत्येक गोष्टीची माहिती पोचवणारी मीडिया म्हणजे सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र बहुजनांचे क** शिस्तीचा देखावा करणारे अधिकारी मूग गिळून गप्प का त्यानंतर इन्शुरन्स पियूसी नसताना वाहन पासिंग होते कसे काय दिनांक 7/1/ 2025 वाहन चाचणी करण्यात येणाऱ्या मोहाडी ट्रॅक वर चार चाकी गाडी क्रमांक MH 19 Q 9635 सागर मोटर ड्राइविंग यांच्या गाडीतून टेस्ट ड्रायव्हिंग घेण्यात येत होती त्या गाडीची ऑनलाईन माहिती काढली असता त्या वाहनाची फिटनेस मुदत 22 ऑक्टोबर 2024 रोजी संपली होती त्यानंतर दिनांक 16 जानेवारी 2025 ऑनलाइन माहिती घेतली असता फिटनेस पासिंग मुदत 5 वर्षाकरिता वाढवली त्या वाहनाचा विमा इन्शुरन्स पीयूसी संपली असताना नूतनीकरण कसे झाले? ही चर्चा महत्वपूर्ण असून प्रादेशिक परिवहन जळगाव विभाग यांनी नूतनीकरण एवढ्या लवकर कसे केले इतरांचे का होत नाही उदाहरणार्थ एखादी गाडी जुनी झाली असेल त्या फोरविलर गाडींसाठी नूतनीकरण करण्यासाठी कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी लागतो कागदपत्र कधी तर गहाळ होतात जबाबदार कोण सागर मोटार ड्राइविंग यांच्या फोर व्हीलर नूतनीकरण करण्यासाठी काहीच विलंब लागला नाही याचा अर्थ जनतेचे काम करण्यासाठी अतिरिक्त पैसाही घेतात आणि वेळही लावतात


