ताज्या बातम्या

जळगावचे भ्रष्ट आरटीओ दीपक पाटील यांची मुंबई येथे बदली अकार्यक्षम अधिकारी म्हणून परिवहन आयुक्तांचा आदेश


जळगाव आरटीओ दीपक पाटील यांची मुंबई येथे अकार्यक्षम अधिकारी म्हणून बदली लाच घेतल्याने पद कलंकित झाले गेल्या महिन्यात 6 डिसेंबर रोजी वाहन निरीक्षकाला नोव्हेंबर महिन्यात नवापूर येथील तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याबद्दल खाजगी पंटर सहाय्यक भिकन भावे याच्यामार्फत तीन लाखाची लाज घेताना लासलुचपत विभाग संभाजीनगर येथील पथकाने अटक केली तर आरटीओ दीपक पाटील यांना एसीबी ने जळगाव आरटीओ कार्यालयातून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याचा बहाणा करून थेट रुग्णालयात दाखल झाले त्यांना कोर्टात सादर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर लगेच त्यांचे आई वारली आईच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर कोर्टाने अंत्यसंस्कारासाठी 14 दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर केला 29 डिसेंबरला पुन्हा कोर्टात हजर झाले दरम्यान अंत्यसंस्कारासाठी दिलेल्या अंतिम जामिन्याचा कालावधीत आरटीओ दीपक पाटील यांनी एसीबी विभागाला तीन वेळा भेटी दिल्या तपासात अपेक्षित माहिती पुरवली त्यामुळे कोर्टात एसीबीने पुन्हा 29 तारखेला दीपक पाटील यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मागितली परंतु कोर्टाने जामीन मंजूर केल्याने दीपक पाटील यांना एकही दिवस अटक झाली नाही परिवहन आयुक्तांचा आदेश राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 3 जानेवारी याबाबत आदेश काढले त्यानुसार जळगाव आरटीओ दीपक पाटील यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत मुंबई परिवहन आयुक्त कार्यालय येथे अकार्यकारी पदावर वर्ग करण्यात आले पाटील यांना आरटीओ पदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले असून जळगाव आरटीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे आरटीओ अशोक पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला अतिरिक्त कारभार अशोक पवार यांनी तातडीने स्वीकारला तसेच मुंबई येथे सेवा वर्ग केलेल्या दीपक पाटील यांना रुजू होण्यासाठी पदग्रहण अवधी प्रवास भत्ता व इतर सरकारी भत्ते लागू होणार नाही असे परिवहन आयुक्त यांनी आदेश दिले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button