रेशनच्या शासकीय गोदामातून 50 किलो तांदळाचा कट्टा 44 किलो 6 किलो तांदूळ कोणी खाल्ला?
रेशनच्या शासकीय गोदामातून 50 किलो तांदळाचा कट्टा 44 किलो 6 किलो तांदूळ कोणी खाल्ला भारतात सर्वच रेशन दुकानांवर हीच परिस्थिती आहे (चोर रास्ता धुंड लेते है लेते है) सध्या जो तांदूळ गहू गोरगरिबांना मिळत आहे ती योजना सरकारने कधीच बंद केली असती परंतु इलेक्शन पाच वर्षांनी होते म्हणून ही योजना सुरू आहे आता नवीन फार्मूला वन नेशन वन इलेक्शन हा फार्मूला सुरू झाला कारण षडयंत्रकारी ईव्हीएम मशीनचे वातावरण तापले त्यामुळे आता नवीन फार्मूला वन नेशन व इलेक्शन मुळे निवडणुका दहा वर्षांनी होतील आता ना सरकारी नोकरी ना सरकारी तांदूळ ना गहू सरकारी सगळ्याच सवलती बंद मोफत धान्य मिळत असल्यामुळे त्यात चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे काही ना काही शोध चोरी करणारे शोधत असतात गोदामातून रेशनचा सर्व प्रकारचा धान्याचा म** निघतो वाहतूक ठेकेदार गोदाम आणि हमाल यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची चोरी होऊ नये म्हणून शासनाने नियम व अटी घालून ठेके दिलेले असतात एवढे असूनही ठेकेदाराला हाताशी धरून पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि माफिया यांचे आर्थिक हितसंबंध नाकारता येणार नाही भोकरदन तालुक्यात रेशन गोडाऊन मधून आलेल्या शासकीय दुकानावर पोत्याचे वजन दुकानदाराने केले 50 किलो ची कोणी फक्त 44 किलो आली मात्र या गोणीचे सील जसेच्या तसे होते सरकारी रेकॉर्डवर 50 किलोची गोणी आणि प्रत्यक्षात भरली 44 किलोची गोणी शेवटी कमी झालेल्या तांदळाची भरपाई गोरगरिबांकडून वसूल केलीच जाते कारण सरकार देत आणि चोर त्याच्यावर डल्ला मारतात स्वस्त धान्य दुकानात कमी आलेले धान्य दुकानदार सुद्धा कमी आलेल्या धान्याची भरपाई रेशन घेणारे ग्राहकांवर मापात पाप करून देतो अनेक वर्षापासून होत असलेल्या कमी धान्याच्या बाबतीत कोणीही पुढे यायला तयार नाही आणि वरती काळाबाजार होतो त्याबद्दलही कोणी तक्रार अर्ज देत नाही झळ मात्र सर्वसामान्यांना बसते गोरगरिबांच्या रेशनच्या धान्यावर डल्ला मारणारे या चोरीच्या धंद्यातून अफाट कमाई करून करोडपती झाले यांची चौकशी होत नाही यातील काही हिस्सा राजकारणी पुढारी आणि अधिकाऱ्यांना दिला जातो त्यांना ते सुद्धा कमी पडत आहे आता फक्त तेच खायचं राहिले आहे जो ग्राहक धान्य घेतो त्याला तक्रार करायचा अधिकार 1001 टक्के असतो परंतु तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे अनेक जण यामध्ये गुंतलेले आहेत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी वजन माप तपासून घ्यावे धान्य घेतल्यानंतर पावती घ्यावी पावती देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असेल तर त्याची तक्रार तहसीलदार त्यानंतर प्रांताधिकारी आणि त्यांनी ऐकलं तर नाशिक विभाग यांच्याकडे तक्रार करावी त्या दुकानाचे लायसन जमा होईपर्यंत आपण लढा देत राहावा आता मैदानात उतरा सगळ्या गोष्टींसाठी अन्यायासाठी लढा द्या