ताज्या बातम्या

राजे छ.शिवाजी महाराज उद्यानाच्या सौंदर्यी करणासाठी सूचना मेहरूण तलाव परिसरात दुसऱ्या घाटाच्या निर्मितीचे काम सुरू जळगावच्या विकासाला जी अधोगती निर्माण झाली होती ती अधोगती विकासात बदलवून दाखवणार महापौर दीपमाला काळे यांची स्पष्टतोक्ती यांचेसह सभापती, अधिकाऱ्यांची पाहणी ; स्वच्छतेचे आदेश


जळगाव जिल्ह्याचे व शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव आणि छत्रपती शिवाजी उद्यान परिसराच्या विकासासाठी जळगाव महानगरपालिका प्रशासन आता सरसावले आहे. सोमवारी १६ मार्च रोजी महापौर दीपमाला काळे यांनी या परिसराची सविस्तर पाहणी केली. यावेळी तलाव सुशोभीकरण, स्वच्छता आणि नवीन सुविधांबाबत त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.उद्यानाची स्वच्छता आणि सुविधांवर भर छत्रपती शिवाजी उद्यानाच्या पाहणीदरम्यान महापौरांनी उद्यानातील काडीकचरा, वाळलेल्या फांद्या आणि अस्वच्छता तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना या उद्यानात चांगल्या सुविधा मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.राज्यातील सर्वोत्कृष्ट ‘टिशू कल्चर लॅब’यानंतर महापौरांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकची त्यांनी माहिती घेतली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या मालकीच्या जागेवर राज्यातील सर्वोत्कृष्ट अशी ‘टिशू कल्चर लॅब’ उभारली जात आहे. या लॅबमधील वृक्ष इतर संस्थांना वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही लॅब उभारताना महापालिकेशी झालेला करार आणि तांत्रिक बाबींची माहिती यावेळी वनविभागाचे अधिकारी समाधान सोनवणे यांनी महापौरांना दिली. मेहरूण तलावावर ‘गणेश घाटा’च्या धर्तीवर विकास तलाव परिसरात ट्रॅक जवळ सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. तलावाच्या एका बाजूला गणेश घाटाप्रमाणे आकर्षक पायऱ्यांची रचना करण्यात येत आहे. तलाव परिसरात रेलिंग बसवून तो भाग बंदिस्त करण्यात येईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच दोन बोटी सुरू करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तलावातील जलपर्णी महापालिकेने काढली असून, परिसरातील झाडाझुडपांची सफाई केली जाणार आहे. तलाव परिसरात पशुपालकांनी म्हशी आणू नयेत, यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक व प्रतिबंधात्मक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले. पुलाखाली छोटा ब्रिज तयार करून समांतर मार्ग (ट्रॅक) विकसित केला जाणार आहे.या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालानी, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, ऋतिक ढेकळे, रेखा पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले, संदीप मोरे, विजय मराठे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button