जिल्हा जळगाव तालुका पाचोरा खडकदेवळा बु; येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन (पाचोरा तालुका प्रतिनिधी अनिल आबा येवले)

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा खडकदेवळा बु; येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन खडकदेवळा बु.!! येथे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचक महोत्सव पंधरवाडा १ जानेवारी ते १५ जानेवारी निमित्त मोठ्या उत्साहात माध्यमिक विद्यालय खडकदेवळा व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद गरुड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाच्या सचिव सौ. गीतांजली पाटील वाचनालयाचे विश्वास पाटील संजय निकम देवचंद गायकवाड उत्तम पाटील पर्यवेक्षिका कुंदा पाटील आर. डी. सुर्यवंशी एन. एन. पाटील एम. जे. पाटील घोडके सर परदेशी सर परदेशी मॅडम स्वप्निल बागुल सर सागर राजपूत विक्की पाटील ग्रंथपाल यशवंत पाटील इ. उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले वाचक महोत्सव पंधरवाडा मध्ये प्रथम दिवशी ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन, प्रश्नमंजुषा वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण व कथाकथन स्पर्धा वाचन संवाद वाचन उपक्रमाचे आकलन व विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रथम आलेल्या सहभागी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सुरवातीला विद्यार्थ्यांनी कॉपी मुक्त अभियानाची शपथ घेऊन कॉपी मुक्त परीक्षेवर मार्गदर्शन करण्यात आले मोबाईल टीव्ही चे दुष्परिणाम व पुस्तकांशी मैत्री यावर आपल्या मनोगतात मुख्याध्यापक गरुड सरांनी सांगितले की वाचनाने आयुष्यात आमुलाग्र बदल होतो व ज्ञान जिज्ञासापूर्तीसाठी वाचन संस्कृती वाढीस व गोडीस लागणेही तितकेच महत्त्वाचे आहे आयुष्यात आपल्याला पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाची दरवाजे खुली केली म्हणून आपण आज अनेक पदापर्यंत पोहोचत आहोत आपण सातत्याने मोबाईल टीव्ही चा वापर करू नये पुस्तकांशी मैत्री करावी म्हणजे आपल्या आयुष्यात आजारपण न येता ज्ञानाचे शहाणपण निश्चित येईल भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन वाचनाने अभ्यासाने आपले लक्ष्य साध्य केले वाचनाने आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपल्या मेंदूला चांगल्या गोष्टींची चालना मिळते म्हणून आपण सातत्याने वाचन करत असले पाहिजे चांगल्या वाचनाने वाईट विचार व गैरप्रकार आपल्या मनात कधीच येत नाहीत व आपल्या मन मनगट मेंदूच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो असे ते शेवटी म्हणाले वाचनात सहभागी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले प्रथम भाग्यश्री गोपाल सूर्यवंशी द्वितीय कल्याणी प्रवीण देवरे तृतीय अंकिता दीपक तेली आणि सहभागी सुमित अशोक दाभाडे रिया निंबा मोरे स्वराज दिनकर पाटील भाग्यश्री समाधान पाटील हर्षदा ऋषेंद्र पाटील मनीषा कैलास पाटील, चेतन शेषराव दाभाडे, भूमिका आनंदा पाटील मानसी सिताराम तेली दिपाली दिलीप गायकवाड प्रतीक संजय तेली, जागृती रामराव पाटील इ. बक्षीस आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले प्रास्ताविक डॉ. यशवंत पाटील सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील सरांनी तर आभार प्रदर्शन आर. डी. सुर्यवंशी सरांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खडकदेवळा यांनी परिश्रम घेतले


