ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका भुसावळात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी) गोपी अण्णा
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथे शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला हा शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगण (जुने डी. एस. हायस्कूल प्रांगण), भुसावळ येथे पार पडला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमास नागरिक अधिकारी कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीमती निता लबडे यांनी केले होते



