जिल्हा जळगाव तालुका पाचोरा अतिवृष्टीमुळे घर कोसळल्याने बारा वर्षाचा बालकाचा मृत्यू तर दुसरा लहान बालक जखमी झाला आहे मयत बालकाचे वडिलांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असून तो एकुलता एक असल्याने मायेचे छत्र हरपले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

सुमारे दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेक लोक बेघर झाले कोणाचे शेत वाहून गेले तर कोणाचे जनावरे गुरेढोरे वाहून गेले अत्यंत मनाला चटका लावून जाणारि घटना काल दिनांक 29 सप्टेंबर सोमवारी रोजी घडली एकसारखा पाऊस असल्यामुळे मातीच्या भिंतीत ओलावा घुसला त्यामुळे अचानक घर कोसळल्याने 12 वर्षाचा महेश नितीन राणे लहान मुलगा मरण पावला काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून तो आई सह दोन बहिणीं चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथे राहत होते मुलांना शिक्षणासाठी त्याची आई आपल्या भावाकडे पाचोरा कृष्णापुरी येथे घेऊन आली होती प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते मुलगा शिकून काहीतरी करेल वृद्धकाळात आईचा सहारा म्हणून मुलगा असतो परंतु तोही मरण पावल्याने पाचोरा शहरात व कृष्णापुरी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा मरण पावल्यामुळे आईचे दुःख किती अफाट असते याची कल्पना करता येत नाही आता सगळं गेलं उरलं काय समोर फक्त मुलाचा चेहरा दिसत असतो: पहिले जुने घर हे मातीचे होते मातीमध्ये असायचे आजही भरपूर घर मातीचे आहेत पाणी मुरल्याने अचानक घर कोसळले इतक्या वर्षात एवढी पर्जन्यवृष्टी कधीही पाहिली नाही आतापर्यंत पावसाने रेकॉर्ड ब्रेक केले इतका पाऊस आतापर्यंत झाला नव्हता सुमारे 25 ते 30 वर्षात पूर्वी सुद्धा एवढा पाऊस झाला नाही असे जुने लोक सांगतात परंतु परतिच्या पावसाने अनेक जणांचे संसार कुटुंब शेती गुरे जनावरे काळाच्या ओघात वाहून गेले होतं ते अचानक नाहीसं झालं शेवटी निसर्ग आहे निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी वृक्ष त्या प्रमाणात असलेच पाहिजे त्यामुळे अशी हानी भविष्यात टाळता येईल







