कुंपणच शेत खायला लागले जि; जळगाव ता; चाळीसगाव पाटणादेवी व जि; संभाजीनगर ता; कन्नड गौताळा autumn घाट (गौतम ) अभयारण्यात क्षेत्रीय वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर चंदन साग वृक्षाची कत्तल यांना नोकरीचे पैसे अपुरे पडतात म्हणून देशाची नैसर्गिक संपत्ती संपवायला निघाले

जिल्हा संभाजीनगर तालुका कन्नड गौताळा autumn घाट (गौतम ऋषी यांच स्थान) तसेच चाळीसगाव पाटणादेवी अभयारण्यात क्षेत्रीय वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर चंदन वृक्षाची कत्तल होत आहे यांना नोकरीचे पैसे अपुरे पडतात म्हणून देशाची नैसर्गिक संपत्ती संपवायला निघाले अनेक ठिकाणी आपण पाहत आहे मोठमोठे जंगल सरकार सुद्धा समाप्त करत आहे त्याचाच फायदा घेऊन वनाधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होत आहे त्यानंतर पाटणादेवी जिल्हा जळगाव तालुका चाळीसगाव या ठिकाणीही चंदनवृक्षाची कत्तल होत असून जवळपास दहा ते पंधरा जणांचे टोळके चंदन चोर रात्रीचे जंगलात फिरून वृक्ष तोडीत आहे आणि रातोरात चंदनाच्या वृक्षांची वाहतूक करून ठिकाणावर पोचवत आहे वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असून जंगलातील जनावरे हिंस्र प्राणी लोकवस्तीमध्ये येऊन पाळीव जनावरांचा फडशा पाडीत आहे स्थानिक आदिवासी व गावातील रहिवासी यांच्यावर मोठे संकट आले असून रानडुक्कर तर शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उध्वस्त करीत आहे वरिष्ठ पातळीचे अधिकारी लक्ष देतील का? त्यांच्यापर्यंत सुद्धा या वृक्षतोडीचे विषयाची माहिती नाही का? या अनुषंगाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेंट्रल एम्पॉवर्ट कमिटी व राष्ट्रीय हरित लवाद मुख्य कार्यालय नागपूर यांच्यामार्फत तपासणी करून एकूण चंदनाची सागाची किती झाडे कापली गेली त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पगारांमधून पैसे कपात करण्यात यावे तपासणी अंतर्गत निदर्शनात आलेले वन अधिकारी व कर्मचारी यांना पैसे वसूल करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी जनता करीत आहे








