कोल्हापुर जिल्ह्यातील बहुजन मुक्ती पार्टी आजरा युनिटच्या दणक्याने प्रशासन आले ताळ्यावर बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन समस्या सोडविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे या आंदोलनांच्या रेट्यामुळे प्रशासन जनतेच्या समस्या सोडवण्यास बाध्य होत असुन जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देत आहे प्रशासनाची झोप उडविण्यात बहुजन मुक्ती पार्टीला दिवसेंदिवस यश मिळत आहे

प्रशासनाची झोप उडविण्यात बहुजन मुक्ती पार्टीला दिवसेंदिवस यश मिळत आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातुन केलेली लक्षणीय आंदोलने उदा.लातुर जिल्ह्यातील गावखेड्यातील शाळा वाचवा आंदोलन छत्रपती संभाजी नगर मधील मुस्लिम बांधवांचे कब्रिस्तान आंदोलन विदर्भातील शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा शाळा वाचवा आंदोलन मुंबई येथे झालेले कॉन्ट्रॅक्टबेस कर्मचारी आंदोलन मुंबईत झालेले माजी सैनिक आरक्षित जागा हस्तांतरित आंदोलन हे उदाहरणे देता येतील आणि या आंदोलनाला यश देखील मिळालेले आहे कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील लक्षवेधी आंदोलने प्रशासनाची झोप उडवित आहे कोल्हापुर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील जनतेच्या प्रश्रांना आंदोलनाद्वारे सोडविण्याचा प्रयत्न बहुजन मुक्ती पार्टी आजरा युनिट मा.डॉ.उल्हास त्रिरत्ने साहेब(राज्य कार्यकारी अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी) यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे १०८ ची ॲम्ब्युलन्स सुरु करणे खाजगी ट्रॅव्हल्सचे दर नियमित करणे आजरा शहरातील कच-याचे व्यवस्थापन करणे टोल नाका बंद करणे आज-यामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावणे,२२ गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळणे गावात एस.टी.(बस) ची सुविधा मिळणे खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करणे अशाप्रकारे जनतेच्या वेगवेगळ्या समस्यांचे विषय घेऊन आजरा तालुक्यात आंदोलने करुन प्रशासनाला धारेवर धरले गेले अदधिका-यांना जाब विचारुन त्यांची झोप उडविण्याचे काम केल्याने बहुजन मुक्ती पार्टीचा धाक आज-यात निर्माण झाला आहे व होत आहे विविध आंदोलनांमुळे लोकांच्या समस्यांना वाचा फोडणा-या बहुजन मुक्ती पार्टीकडे लोक आकृष्ट होत आहेत बहुजन मुक्ती पार्टीच्या एका साध्या निवेदनाने आजरा तालुक्यातील रस्त्याचा प्रश्र लागला मार्गी आजरा तालुक्यातील विटे ते धनगर वाडा क्रं.१ या दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवुन मिळणे व रस्ता दुरुस्त करावा या मागणीचे साधे निवेदन मा.डॉ.उल्हास त्रिरत्ने यांनी तेथील ग्रामस्थांना सोबत घेऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने उपअभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापुर यांना दि.३० जुलै २०२५ रोजी निवेदन दिले होते दोन ते तीन वेळा फोनवरुन डॉ.त्रिरत्ने यांनी फोनवर पाठपुरावा केला बहुजन मुक्ती पार्टीच्या यापुर्वीच्या आंदोलनाची माहिती या अधिका-यांना माहिती असल्यामुळे व बहुजन मुक्ती पार्टीच्या रेट्यामुळे म.उप अभियंता कोल्हापुर यांनी डॉ.उल्हास त्रिरत्ने यांना दि.२८/८/२०२५ रोजी पत्र पाठवुन बहुजन मुक्ती पार्टीने दिलेल्या निवेदनानुसार मागणी मान्य झाल्याचे कळविले हा रस्ता चित्री या गावाचा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास होत असल्याने वर्दळीचा झाला असल्यामुळे व हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे प्रशासनाने बहुजन मुक्ती पार्टीच्या एका साध्या निवेदनाने हा प्रश्र सोडविल्यामुळे आजरा तालुक्यातील जनतेत सध्या बहुजन मुक्ती पार्टीचीच चर्चा सुरु आहे आजरा तालुका समस्या मुक्तीचे शिलेदार जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी एका हाकेने आंदोलनासाठी त्यागी समर्पित इमानदार व जनतेच्या समस्यांची जाण व ती सोडवण्यासाठी लढवय्ये कार्यकर्त्यांची फळी असल्याशिवाय कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही डॉ.उल्हास त्रिरत्ने यांच्या सोबत मा.डॉ.राहुल मोरे सर मा.डॉ.सुदाम हरेर सर मा.अमित सुळेकर सर मा.किरण के.के. साहेब मा.शरद कुंभार सर मा.शरद पाटील साहेब मा.नितीन राऊत साहेब मा.सुर्यका़त का़ंबळे सर मा.प्रकाश नाग साहेब मा.झुल्फिकारभाई शेख मा.शेखरभाऊ देशमुख मा.जोतिबा सुतार सर ही इमानदार त्यागी समर्पित निर्भिड निस्वार्थी जनतेच्या समस्यांची जाण असलेली व एका हाकेनिशी लढण्यासाठी नेहमीच तयार असणारी मावळ्यांची फौज आहे या फौजेने आपल्या आंदोलनात्मक भुमिकेमुळे एक आश्वस्त भुमिका आजरा तालुक्यातील जनतेत निर्माण केली आहे…..या सर्व कार्यकर्त्यांना आज-यातील जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळत आहे यामुळे इतर राजकीय पक्षातील प्रस्थापित पुढा-यांत चुळबुळ सुरु झाली महाराष्ट्रातील बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्रांना हाती घ्यावेत महाराष्ट्रीयन जनतेची अपेक्षा महाराष्ट्रातील सर्वच जनता वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी त्रस्त आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकही राजकीय पक्ष किंवा तथाकथित पुढारी पुढाकार घेताना दिसत नाही पुढारी राजकीय नेते वैयक्तिक स्वार्थापोटी दिवसातुन दोनदोन वेळा पक्ष बदलवताना दिसत आहेत त्यांना जनतेच्या प्रश्रांचे काही देणे घेणे नाही जनता जाए तेल लगाने अशी प्रस्थापित राजकीय पक्षांची व पुढा-यांची वृत्ती झाल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे या समस्या बहुजन मुक्ती पार्टीने सोडवायला हव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्राची जनता करत आहे म्हणुन बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील जिल्ह्यातील तालुक्यातील व गावातील स्थानिक समस्या हाती घेऊन व लोकांच्या वैयक्तिक समस्यांना आधार बनवुन आंदोलन करावे व जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्राची उबगलेली,त्रासलेली जनता करत आहे…म्हणुनच या बाबतीत बहुजन मुक्ती पार्टीने आता निर्णायक भूमिकेत यावे ही विनंती





