जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनिल आबा येवले यांची नुकतीच दि पाचोरा पिपल्स बॅंकेच्या स्विकृत संचालक पदी निवड झाल्यामुळे पाचोरा पत्रकारां मध्ये मानाचा तुरा रोवला गेला त्यानिमित्ताने पाचोरा तालुका पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन नाना सो; संजय वाघ व पिटीसी संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अनुभवी पत्रकार प्रत्येक अधिकारी असो पोलीस किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असो किंवा कार्यकर्ता असो अनिल आबा येवले नेहमी दोन्ही बाजूच्या समस्या ऐकून झाल्यावर तक्रारींचे निवारण करतात आतापर्यंत कोणाबरोबर त्यांचे वाद झालेच नाही सगळ्या गोष्टी समजून सांगणारे कोणाचेही सुखदुःखात नेहमी हजर असतात विशेष म्हणजे ते पूर्ण मुस्लिम वार्डात राहतात सर्वधर्म समभाव त्यांच्या अंगी आहे समाजात आतापर्यंत प्रतिष्ठा व मान त्यांना मिळत असतो कोणीही फोन केला तरी अनिल आबा हे मदतीला धावून येतात त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी मानणारे लोक आहेत याच कारणामुळे त्यांची नियुक्ती दि पाचोरा पिपल्स बॅंकेच्या स्विकृत संचालक पदी निवड झाल्याबद्दल पाचोरा तालुका पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ पाचोरा पीपल्स बँक संचालक भागवत आबा मालपुरे एम एम कॉलेज माजी प्राचार्य डॉ: बापूसो बी एन पाटील पिटीसी संचालक भोला आप्पा चौधरी कॉलेज उपप्राचार्य वासुदेव वले सर गो.से .हायस्कूल मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे सर यांनी पाचोरा पिपल्स बँके नुतन स्वीकृत संचालक अनिल आबा येवले यांचा सर्वांनी आज १४ आऑगस्ट गुरुवार रोजी सत्कार केला




