यह आजादी जुटी है देश की जनता भूखी है लुटेरों की चांदी है लोकशाहिर साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त..! संपूर्ण देशात मिरवणुका उत्साहात व शांततेत

15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर 60000 लोकांचा मोर्चा काढला हे बहुजनांचे स्वातंत्र्य नाही एक विदेशी गेले आणि दुसरे विदेशी भारताच्या सत्तेमध्ये बसले किती हुशार व्यक्तिमत्व होतं यह आजादी जुटी है देश की जनता भूखी है लुटेरों की चांदी है या घोषणा देत संपूर्ण देश हादरला हा मोर्चा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कशासाठी काढला गेला ही चर्चा जगभर पसरली आजही महाराष्ट्र ही अनेक नररत्नांची खाण आहे इथल्या भूमीत अनेक महानायक व महानायिका जन्माला आले ज्यांनी इतिहासात आपले अजरामर व अढळ स्थान निर्माण केले आहे ज्यांच्या विचारांची व कार्याची छाप केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उमटलेली दिसून येते रशियात जाऊन राजे छत्रपतीं शिवराय यांचे पोवाडे गडकिल्ले याविषयीचे शिवरायांची युद्ध रणनीती रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासमोर सादर केले आणि ते ऐकून राष्ट्राध्यक्ष यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कौतुक करून बक्षीस दिले त्यावेळेस रशियात सुद्धा राजे छत्रपती शिवराय यांचा पुतळा उभारला गेला महाराष्ट्रात जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांचे कार्य देखील अशाच दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारे आहे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे एका मातंग जातीत जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे हे लौकिक अर्थाने केवळ दीड दिवस शाळेत गेले परंतु शाळेच्या सवर्ण जातीच्या मास्तराने अण्णाभाऊंच्या बालमनावर जातीयतेचे ओरखडे उमटविल्याने त्या सवर्ण मास्तरावर तसेच शाळेवरच दगड भिरकावून अण्णा भाऊ शाळा आणि शिक्षण यापासून कायमचेच परागंदा झाले केवळ दीडच दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे नंतर महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एक क्रांतिकारी साहित्य सम्राट म्हणून प्रख्यात झाले
अण्णा भाऊ साठे यांनी खालील प्रमाणे आपली उत्कृष्ट साहित्य संपदा निर्माण केली १३ लोकनाट्य ३५ कादंबरी १३ कथासंग्रह ७ चित्रपट कथा ३ नाटके १५ पोवाडे
१ शाहिरी पुस्तक १ प्रवासवर्णन वरीलप्रमाणे विविध प्रकारची विपुल अशी साहित्य संपदा अण्णांनी आपल्या वरदहस्त लेखणीतून निर्माण केली इतकी बहुरंगी बहुढंगी आणि विविधांगी साहित्य निर्मिती करून अण्णाभाऊ साठे हे ख-या अर्थाने बहुजनांचे तथा मराठी साहित्य विश्वाचे साहित्यसम्राट ठरतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासोबतच ते कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावात असल्याने थेट रशियात जावून त्यांनी शिवाजी महाराजांसोबत विख्यात कम्युनिस्ट विचारवंत स्टालिन आणि लेनीन यांचेही पोवाडे गाऊन सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण केली परंतु कम्युनिस्ट विचारसरणीचे कट्टर समर्थक असूनही त्या पक्षातही त्यांना तथाकथित ब्राह्मण व सवर्ण जातीच्या लोकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली असे त्यांचे बधू शंकर भाऊ साठे यांनी त्यांच्या आत्म चरित्रात नोंदवून ठेवले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आपली अपार कृतज्ञता व्यक्त करताना अण्णा भाऊ साठे यांनी आपली प्रसिद्ध शाहिरी रचना लिहून ठेवली ज्यात अण्णा भाऊ साठे म्हणतात ‘जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील शोषित वंचित विस्थापित गिरणी कामगार शेतकरी शेतमजूर वेठबिगार अशा ‘;उध्वस्त*’ माणसाला आपल्या साहित्यात केंद्रस्थानी ठेवून आपली साहित्य निर्मिती केली म्हणूनच अण्णा भाऊ साठे आपला एल्गार पुकारताना म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे.अशा या महान शाहिरास, साहित्य सम्राटास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
S.k.wankhede






