जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत ३ स्टार मानांकन प्राप्त पाचोरा शहर स्वच्छ शहर असून पाचोरा नगरपरिषद यांच्या कायमस्वरूपी स्वच्छते विषयी अतिशय काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी दक्ष असल्यामुळे पाचोरा नगर परिषदेस स्वच्छ संरक्षण 2024 अंतर्गत 3 स्टार मानांकन मिळाले

पाचोरा केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालय यांच्याकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण-2024 हे अभियान राबविण्यात येते त्यानूसार सन2024 वर्षाअंतर्गत झालेल्या स्पर्धेत पाचोरा नगरपरिषदेने देखील सहभाग घेतलेला होता सदर स्पर्धेचा निकाल 17 जुलै 2025 रोजी जाहीर झाला असून स्पर्धेच्या विविध निकषांवर काम करीत नगरपरिषदेने एकूण 12500 गुणांपैकी 8294 गुण प्राप्त करुन पाचोरा शहर राज्यात 136 व्या स्थानावर तसेच नाशिक विभागात 9 व्या क्रमांकावर आणि स्वच्छ शहरांमधून देशाच्या 50 हजार ते 3 लक्ष लोकसंख्येच्या गटात 186 व्या क्रमांकाचे तसेच जळगांव जिल्ह्यातील ब वर्ग नगरपरिषदांच्या गटामध्ये 4 था क्रमांकांचे स्थान प्राप्त करीत हागणदारी मुक्त ODF++ व कचरा मुक्त शहर अंतर्गत 3 स्टार मानांकन प्राप्त केलेले आहे यामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे पाचोरा नगरपरिषदेने प्राप्त केलेल्या या यशाबद्ल शहरातून सर्वत्र कौतूक होत असून नागरीकांनी यापुढे देखील नगरपरिषदेस स्वच्छता आरोग्य व अनुषंगीक बाबींमध्ये सहकार्य केल्यास अधीक यश प्राप्त होऊ शकते असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले असून सदरच्या स्पर्धेत प्राप्त झालेले यश हे माझ्या आरोग्य विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या मुळे शक्य झाले आहे असे देखील मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगीतले





