रक्षक बनले भक्षक ग्राहक तक्रार निवारण फक्त नावाला उरले पुणे येथील एसीबीच्या पथकाने ग्राहक तक्रार निवारण करणाऱ्या चावंडके या इसमाला दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसांची पिळवणूक होत असताना दिसत आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांवर अन्याय होतो तो ज्या ठिकाणी न्याय मागायला जातो त्याच ठिकाणी त्याच्यावर अन्याय होतो

1 जुलै 2025 रोजी पुणे येथील एसीबीच्या पथकाने सापळा रचून ग्राहक तक्रार निवारण मंचाचा जबाबदार असणारा लाचखोर चावंडके याला नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातील तक्रारदाराकडून दीड हजार रुपयाची लाज स्वीकारताना रंगेहात पकडले या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण झाले आहे कारण तो ज्या ठिकाणी न्याय मागायला जातो त्याच ठिकाणी त्याला अन्याय सहन करावा लागतो भ्रष्टाचारी सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान होऊन सामान्य जनतेला सगळ्याच गोष्टीना सामोरे जाऊन न्यायाची प्रतीक्षा करावी लागते परंतु प्रतीक्षा करूनही अन्याय होत असेल तर सामान्य माणसांनी जगावे कसे न्याय कोणाकडे मागावा सरकार कोणतेही असू द्या संविधाना नुसार कार्य करीत नसल्यामुळे आज भारतात भ्रष्टाचार बोकाळला असून भ्रष्टाचार बलात्कार इतका वाढला त्याच्यावर नियंत्रण सरकारचे नसल्यामुळे आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होत नसल्यामुळे सगळ्यात खात्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू असून भ्रष्टाचार थांबणार तरी कधी प्रमोशन बदल्या यासाठी तर लाखो करोडो रुपये देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो भ्रष्टाचार होत असल्यामुळे सामान्य जनता उपाशी आणि भ्रष्टाचारी तुपाशी असा प्रकार रोज हजारो ठिकाणी पाहायला मिळत आहे याचा अर्थ भारत देशाविषयी कोणालाही प्रेम राहिले नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे? ज्याच्या हातात ससा तोच पारधी एखाद्या ग्राहकावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी ग्राहक तक्रार निवारण यांच्याकडे जाऊ नये का? असा प्रश्न कालच्या पुण्याच्या घटनेवरून दिसून येत आहे




