महाराणी ताराबाई सारखी मुसदी राणी जगाच्या इतिहासात झाली नाही आम्हाला महाराणी ताराबाईचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर इतिहास वाचावा लागेल त्यासाठी इतिहासकार लेखक राजेंद्र घाडगे यांनी राज धुरंदर ताराराणी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे उद्घाटन समयी डॉक्टर जयसिंगराव पवार

महाराणी ताराबाई यांचा इतिहास अजून पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नसून महाराणी ताराबाई कोण होत्या? त्यांनी कोणासाठी युद्ध केले असे अनेक प्रश्न आणि शेवटी तर त्यांचे नाव सुद्धा बदलण्यात आले इतिहास लेखक मां राजेंद्र घाडगे यांनी संपूर्ण इतिहास राज धुरंदर ताराबाई या नावाने ग्रंथ लिहिला ताराबाई कोण होत्या त्यांनी कोणासाठी कार्य केले अतिशय महत्त्वाची जडणघडण आपल्याला इतिहासाच्या खोल मुळापर्यंत गेल्यावर सत्य नक्की समजेल आणि पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यातील इतिहासकार अभ्यासक राजेंद्र घाडगे लिखित राज धुरंदर ताराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर जयसिंगराव पवार बोलत होते ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातूनच संपूर्ण देशाचा इतिहास आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे महाराष्ट्रात अनेक संत विद्वान पंडित शास्त्रज्ञ तयार झाले पण दुर्दैव असं की त्यावेळेस इतिहासकार झाले नाही मुनिमजी होते परंतु जो इतिहास राजे छत्रपती असो किंवा बहुजन महापुरुष असो किंवा राणी ताराबाईचां असो असे अनेक महान संत यांचा इतिहास लिहिला गेला नाही त्यावेळेस बखळ लिहून ठेवायचे पण एक महत्त्वाचे कार्य अनेक जणांचे सुपीक बुद्धी गुणांक असल्यामुळे अनेक वयस्कर यांनी जसेच्या तसा इतिहास बहुजन महापुरुषांचे संतांचे सत्य कथन करून दाखवले त्यामुळे आपल्याला इतिहास समजला डॉक्टर जयसिंग पवार पुढे म्हणाले की नवीन पिढीने सत्य इतिहासाच्या अभ्यासाकडे वळावे वाचन करावे पुरावे शोधावे मराठे शाहीतील अनेक मातब्बर बहुजन महापुरुष संत अनेक महाराणी ताराबाई सारख्या योद्धांचे त्यांनी केलेल्या बहुजनांच्या कार्याची आठवण देण्यासाठी त्यांच्याविषयी जरूर लेख लिहावा त्यामुळे आपला बुद्धी गुणांक वाढतो कारण ज्यावेळेस सत्य इतिहास डोळ्यासमोर येतो त्यावेळेस आपण कोणत्या दुनियेत आहे हे आपल्याला नक्की समजते आपल्याला काय करायचे काय नाही करायचे याच ज्ञान सत्य इतिहास वाचल्यामुळे एक हजार एक टक्के अवगत होते डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर राजेंद्र मोरे उपसचिव रयत शिक्षण संस्था सातारा डॉक्टर विजयराव नलावडे संस्था अध्यक्ष सातारा इतिहास संशोधक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे येथील संपादक श्री संदीप तापकीर उत्तम पाटील सातारा जिल्ह्यातील शहरातील तालुक्यातून अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक मान्यवर शिक्षण क्षेत्रातील लेखक वकील डॉक्टर समाजसेवक सत्यशोधक परिवारातील इतिहासकार उपस्थित होते एडवोकेट विकास पवार यांनी सर्व मान्यवर व उपस्थित असलेले यांचे आभार मानले




